जुन्नर प्रतिनिधी :- रविंद्र भोर
संगमनेर तालुक्यातील कनोलीमध्ये राहणारे चौघे तरुण अकोले तालुक्यातील फोफसंडी येथे फिरण्या- साठी गेले होते.तेथील एका पानवठा नावाच्या धब- धब्यावर गेले असता एका तरुणाचा फोन खाली पडला तो पकडण्यासाठी त्याने प्रयत्न केला असता हा तरुण देखील तोल जाऊन पाण्यात पडला. त्यामुळे त्या मित्राला वाचविण्यासाठी दुसरा तरुण गेला असता तो देखील पाण्यात बुडाला.ही दोघे अशा ठिकाणी बुडाले आहेत जेथे स्थानिक माणसे देखील जात नाहीत.त्यामुळे या दोघांचे शोधकार्य घेऊन देखील ते मिळून आले नाहीत.ही घटना शुक्रवार दि:-२९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. यात अभिजित वर्पे व पंकज पाळंदे ही दोघे बुडाले असून त्यांचा शोध दिवसा करुन देखील अद्याप लागलेला नाही.तर अन्य दोघे सुखरूप असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
जुन्नर व अकोले तालुक्यातील सर्वात शेवटचे दोन्ही तालुक्यांना जोडणारे सीमेवर निसर्गरम्य गाव म्हणजे फोफसंडी होय. येथे पूर्वी सुर्य हा सकाळी १२ वाजता उगवत असे सध्या जंगल तोडझाल्याने ०९वाजता उगवतो तर सायंकाळी साडेचार वाजता मावळतो.त्यामुळे हे ठिकाण पर्यटक व सरकारी अधिकारी यांना कायम साद घालत असते येथील सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी संगमनेर तालुक्यातील कनोली परिसरात राहणारे चार मित्र सकाळी फोफसंडी गावात गेले होते.तेथे त्यांनी कत्तरचोंड धबधबा आणि काही ठिकाणी फिरण्याचा मनमुराद आनंद घेतला.त्यानंतर ते पानवठा धबधब्यावर गेले.
दरम्यान,त्यातील तिघांना पोहता येत नव्हते तर एकाला चांगले पोहता येत होते.त्यामुळे, त्यांनी पाण्यात उतरण्याचा देखील आनंद घेतला.मात्र, खाली खोल दरी आणि त्या दरीत देखील पुर्ण कपार असून तेथे जाण्याचे धाडस तेथील गावकरी देखील करीत नाहीत.अशा ठिकाणी हे तरुण गेले.तेथे गेल्यानंतर एका तरुणाचा फोन पाण्यात पडला.तो पकडण्याच्या नादात त्याचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला.आता तेथील दरी ही प्रचंड खोल असून त्या जागेच्या खोलीचा ठाव हा स्थानिक मानसांना देखील नाही.त्यात या तरुणांनी तेथे जाण्याचे धाडस केले.दरम्यान,एकाचा मोबाईल पडला असता तो मोबाईल पकडण्यासाठी गेला आणि तो बुडू लागला.तो बुडताना पाहुन ज्याला पोहता येत होते. त्याने पाण्यात उडी मारली.
आपण आपल्या मित्राला वाचविले पाहिजे या प्रेमापोटी त्याने जो प्रयत्न केला तो त्यांच्या मैत्रीला सलाम करणारा होता. मात्र, ज्याला पोहता येत नव्हते त्याने आपल्या मित्राला घट्ट मिठी मारली आणि काही वेळानंतर दोघे दिसेनासे झाले. एकाला वाचविण्याच्या नादात दुसऱ्याने आपला जीव धोक्यात टाकला. मात्र ही दोघे बुडत असताना अन्य दोघे जे होते.त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. दोघांना कशी मदत करता येईल याचा पुरेपूर प्रयत्न केला.मात्र इतक्या दुर्गम भागात त्यांना तत्काळ मदत मिळणे अशक्य होते.त्यातील एका तरुणाने धबधब्या- पासून काही अंतरावर येऊन गावातील काही तरुणां- सह घटनास्थळी धावा घेतला.त्यानंतर काही गावकरी त्या धबधब्यावर गेले.मात्र त्यांनी सांगितले की,आम्ही जरी स्थानिक असलो तरी आम्ही या पानवठयाच्या धबधब्यावर कधीच येत नाहीत.कारण हा खोल तर आहेच.मात्र, या पाण्याखाली मोठमोठ्या कपारी देखील आहेत.त्यामुळे, यात उतरण्याचे धाडस कोणी करीत नाही त्यामुळे तेथील लोकांनी देखील वरवर शोध घेतला.मात्र पाण्यात उतरण्याचे धाडस कोणी केले नाही.रात्री उशिरापर्यंत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांचा अथक प्रयत्न चालु होते.मात्र दोघांचा शोध काही लागलेला नव्हता. आज शनिवार दि:-३० सप्टेंबर रोजी सकाळी ०८ वाजता बुडालेल्या दोन्ही तरूणांना राजूर पोलीस पथक,वनविभाग पथका तिल बुळे व आढाळे,जलसंधारण विभाग महसूल विभाग व स्थानिक सरपंच सुरेश वळे,चिमा उंबरे,सदाशिव वळे,दत्तात्रय मुठे,सावळेराम भगत,शांताराम वळे आणि गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णवाहिकाद्वारे अकोले येथील शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी दाखल करण्यात आले आहे.