शुभम वाकचौरे
जांबूत: जांबुत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थतेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी अनेक संस्थेचे सभासद उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक चेअरमन बाळकृष्ण कड यांच्या अध्यक्षतेखाली सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सुरुवातीला उपस्थित सभासदांचे स्वागत करून कार्यक्रम पत्रिकेनुसार सभेचे कामकाज करण्यात आले. या आर्थिक वर्षात भाग भांडवल ११३ लाख,ठेवी १३ कोटी २६ लाख,कर्ज वाटप ९ कोटी २४ लाख,नफा ३३.२९ लाख,कर्ज वसुली ९८.३० % एवढी आहे.
यावेळी उपस्थित सभासदांनी संस्थेने केलेल्या आर्थिक प्रगतीचे कौतुक करून संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. संस्थेने सादर केलेल्या अहवालावर उपस्थित सभासदांनी आपले मत व्यक्त करून सक्रिय सहभाग नोंदविला.या कार्यक्रमासाठी माजी आमदार पोपटराव गावडे उपस्थित होते. पोपटराव गावडे यांनी संस्थेतील कामकाजा विषयी प्रतिक्रिया मांडली.
यावेळी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.संस्थेचे संस्थापक चेअरमन बाळकृष्ण कड यांनी संस्थेने केलेल्या आर्थिक प्रगतीची माहिती सविस्तर सादर केली.तसेच संस्थेने केलेल्या सर्व निकष पूर्तेतेची माहिती दिली.संस्थेच्या प्रगतीमध्ये सहकारी संचालक, कर्मचारी वर्ग याचबरोबर संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे कामकाज पारदर्शक असून सभासदांनी केलेल्या चांगल्या सूचना स्वागतार्ह असतील. तसेच सभासदांचा सक्रिय सहभाग असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सहकार क्षेत्रामध्ये सद्या प्रचंड स्पर्धा असून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सभासद व ग्राहक यांना देण्यात येणारी सेवा महत्त्वाची आहे. तसेच विश्वासार्हता देखील महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. शेवटी सर्व सभासदांचे आभार व्यक्त करून संस्थेचे सभासदांचा १५ टक्के लाभांश जाहीर केला. सभासदांनी संस्थेमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करावी, असे आवाहन केले.सभेला शेवटपर्यंत उपस्थित राहणाऱ्या उपस्थितांपैकी १० भाग्यवान व्यक्तींना लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येकी ५०० रूपये रोख रक्कम भेट देण्यात आले.
या सभेला संस्थेचे व्हा. चेअरमन बाळासाहेब बदर, संचालक बाळासाहेब फिरोदिया, डॉ जयश्री जगताप,बाळासाहेब पठारे, वासुदेव जोरी,अशोक मंदीलकर,पोपट सापते, अलका गाजरे, संस्थेचे बँक मॅनेजर योगेश पावडे , कॅशियर दक्षणा थोरात, क्लार्क सोमनाथ पळसकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, सरपंच दत्तात्रय जोरी , उपसरपंच राणीताई बोऱ्हाडे,ग्रामपंचायत सदस्य पोपट फिरोदिया, सुभाष जगताप, सुप्रिया जगताप, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष माणिक जगताप, अशोक चव्हाण,लहू गाजरे व संस्थेचे सर्व सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू गाजरे यांनी केले. तर आभार संस्थेचे संचालक बाळासाहेब फिरोदिया यांनी सर्वांचे आभार मानले.