▪️निर्वी प्रतिनिधी – शकील मनियार.
निमगाव म्हाळुंगी चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व भाजपा मन कि बात शिरूर तालुका संयोजक श्री बापूसाहेब बबनराव काळे यांची भाजपा मन कि बात च्या पुणे जिल्हा संयोजक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.तसेच श्री बापूसाहेब काळे यांना नियुक्ती पत्र देताना माजी राज्यमंत्री तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळाभाऊ भेगडे, शिरूर हवेली विधानसभा प्रमुख तथा पी डी सी सी बँकेचे विद्यमान संचालक श्री प्रदीपदादा कंद, आणि पुणे जिल्हा उत्तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री शरदभाऊ बुट्टे पाटील यांच्या हस्ते त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले.
भाजपा मन कि बात शिरूर तालुका संयोजक असताना शिरूर तालुक्यात शिरूर शहरासह तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, निमगाव म्हाळुंगी, आलेगाव पागा, आरणगाव, रांजणगाव सांडस, न्हावरे अशा अनेक गावातील शक्तिकेंद्र प्रमुख व बुथ कमीटी अध्यक्ष सर्वांनी बापूसाहेब काळे संयोजक मन की बात यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम यशस्वी केले.अशी माहिती शरदराव रासकर संपर्क प्रमुख भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा यांनी दिली आहे. शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी मन कि बात चे कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरीत्या माझ्या सर्व भाजपा च्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आयोजित करून मला खूप अभिमान वाटला. शिरूर तालुक्यात मला भाजपा च्या सर्व शक्तीकेंद्र आणि बूथ प्रमुखांनी खूप चांगल्या प्रकारे साथ दिली त्या बद्दल मनापासून त्यांचे आभार मानेल तसेच भारतीय जनता पार्टी ने माझ्यावर भाजपा मन कि बात पुणे जिल्हा संयोजक पदी निवड करून जो विश्वास दाखवला त्या बद्दल बापूसाहेब काळे यांनी समाधान व्यक्त केले व भारतीय जनता पार्टीने जी जबाबदारी माझ्यावर सोपविली ती कामाच्या माध्यमातून सार्थकी करून भारतीय जनता पार्टीचे (उत्तर )जिल्हाध्यक्ष आदरणीय शरदभाऊ बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पुणे जिल्ह्यामध्ये वाढवण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या नियुक्ती झाल्याबद्दल शरदराव रासकर संपर्क प्रमुख भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा सह अनेक भाजपा कार्यकर्ते यांनी आनंद व्यक्त केला.