▪️प्रतिनिधी : शकील मनियार
प्रा.जितेंद्रकुमार थिटे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदानपुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ,शिक्षक लोकशाही आघाडी व महिला माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यावर्षीचा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार श्री भैरवनाथ विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाबळ येथील भूगोल विषयाचे शिक्षक प्रा जितेंद्रकुमार थिटे यांना समता पॅलेस फरांदे नगर बारामती येथे समारंभपूर्वक बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा चेअरमन राजवर्धन शिंदे ,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष के.एस.ढोमसे, महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष जी के थोरात, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सदस्य रघुनाथ भोसले सेकंडरी सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्यकारणी सदस्य प्राचार्य अनिल साकोरे,माध्यमिक शिक्षक संघाचे पुणे शहराध्यक्ष सचिन दुर्गाडे ,लोकशाही आघाडी पुणे शहराध्यक्ष शिवाजीराव कामठे ,सिकंदर शेख ,निलेश जगताप प्रा.संतोष थोरात प्रा. शशिकांत शिंदे प्राचार्य मुजावर जिल्हा सचिव पंकज घोलप,कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषद पुणेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शेलार तानाजी झेंडे जिजाबाई थिटे शरद दुर्गे कैलासराव खंडागळे दादासाहेब उदमले मल्हारी उबाळे सुनील जाधव आनंदा गावडे रमेश गावडे चंद्रकांत थिटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष जी के थोरात म्हणाले की शिक्षणामध्ये अनेक नवनवीन विचारप्रवाह येत असून शिक्षकांनी देखील या आधुनिक नवनवीन संकल्पना समजून घेऊन विद्यार्थी विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे संघटना ही शिक्षकांचे हित जोपासण्यासाठी कार्यरत असते म्हणून संघटना बळकटीसाठी मनापासून कार्यरत राहणे गरजेचे आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर दरेकर, स्वागत युवराज वनवे तर आभार दत्तात्रय रोकडे यांनी मानले.