जुन्नर प्रतिनिधी :- रविंद्र भोर

डिंगोरे ता:- जुन्नर गावच्या हद्दीत नगर कल्याण महामार्गावर कारने परप्रांतीय मजूर पादचाऱ्यांना चिरडले या अपघातात तीन ठार व दोन जखमी झाले आहेत. हा अपघात नगर-कल्याण महामार्गावर डिंगोरे गावच्या हद्दीत दत्त मंदिराच्या कठेश्वरी पुला जवळ रात्री सव्वा आठ वाजण्याच्या दरम्यान झाला असून या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक व्यक्ती उपचारादरम्यान मयत झाला असून इतर दोन जखमी आहे.

या अपघातात सुरमल मांजरे,दिनेश तारोले, जगदीश महेंद्रसिंग डावर हे तीन मयत झाले असून विक्रम तारोले,दिनेश जाधव (पुर्ण नावे समजली नाही) या दोघांवर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.सर्व मध्यप्रदेश येथील आहे.या बाबत रुग्णवाहिका चालका कडून मिळालेली माहिती अशी की डिंगोरे येथे मध्येप्रदेश वरून दोन तीन दिवसापूर्वी काही शेत मजूर रोजगारासाठी आले होते.रविवारी रात्री सव्वा आठ वाजे दरम्यान डिंगोरे गावातून शेती मुक्कामाच्या ठिकाणी नगर कल्याण महामार्गावरून पायी चालले असताना कठेश्वरी पुला जवळ डिंगोरे बाजूला भरधाव वेगाने कल्याण बाजूने भरधाव आलेल्या कारने या पायी चाललेल्या सर्वाना उडवले.या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले असून एक व्यक्ती उपचारादरम्यान मयत झाला आहे. तसेच इतर दोघे उपचार घेत आहे.दरम्यान ओतूर पोलीस घटनास्थळी पहाणी करून पुढील तपास करीत आहेत.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button