जुन्नर प्रतिनिधी :- रविंद्र भोर
जुन्नर शहरातील विविध विकासकामांकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करून ३ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर -करण्यात आला.यापैकी पहिल्या टप्प्यात १ कोटीहून अधिकची कामे – मंजूर झाली असून, या कामांचे – भूमिपूजन भाजप नेत्या तसेच जिल्हा नियोजन मंडळ सदस्या आशाताई बुचके यांच्या हस्ते करण्यात आले.
जुन्नर येथील पंचलिंग मंदिर, अमरनाथ सेवा मंडळ सभामंडप,दशनाम गोसावी समाज दफनभूमी सरंक्षक भिंत,बोडकेनगर वसाहत पाइप गटार,शिपाई मोहल्ला पाइप गटार,सिमेंट रस्ता ताजनेमळा,उत्तरेश्वर मंदिर रस्ता डांबरीकरण व पाइप गटार या कामांचा समावेश आहे.जिल्हा नियोजन मंडळ महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना जिल्हास्तर याअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कामांच्या भूमिपूजन प्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष संतोषनाना खैरे,दिलीप गांजाळे,अनिल मेहेर,शहराध्यक्ष सचिन खत्री,संजय परदेशी नीलेश गायकवाड,श्रीकांत मिरगुंडे,अनिल रोकडे,मंदार बुट्टे पाटील,किरण काळे,नगरपरिषद बांधकाम विभागाचे हरी गायकवाड,बाळासाहेब भोसले आदींसह भाजपचे पदाधिकारी तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.