निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणाने अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. राज्यात ठिकठिकाणी मोर्च निघून आरक्षणाची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवरआज शिरूर शहरात मनोज जारंगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरिता मराठा क्रांती मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी शिरूर तहसील कार्यालयाच्या आवारात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन केले. एकदिवसीय उपोषण आंदोलनात राणी कर्डिले, वैशाली गायकवाड, शशिकला काळे, सुवर्णा सोनवणे, शृतिका झांबरे यांनी सहभाग घेतला.

यावेळी मराठा समाजाला आरक्षण तातडीने जाहीर करावे अशी आग्रही मागणी करण्यात आली. सायंकाळी नायब तहसिलदार स्नेहा गिरीगोसावी व पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या हस्ते लिंबू सरबत घेवुन व त्यांना या संदर्भात निवेदन देत हे उपोषण सोडण्यात आले. दरम्यान दिवसभरात उपोषण स्थळी विविध संस्था संघटना यांच्या प्रतिनिधीनी भेट देवुन आंदोलनकर्त्यास पाठिंबा दिला.

यावेळी जिजामाता सहकारी बँकेच्या संचालिका मनिषा कालेवार, जिल्हा परिषद माजी सदस्या कोमल वाखारे, संगीता शेवाळे, शोभना पाचंगे, वैशाली बांगर, संगीता रोकडे, ज्योती हांडे, राजश्री ढमढेरे, सविता बरूडे, जिजामाता सहकारी बँकेच्या संचालिका मनिषा कालेवार, जिल्हा परिषद माजी सदस्या कोमल वाखारे, उमेश शेळके, अॅड रवींद्र खांडरे, रमेश दसगुडे, रुपेश घाडगे, अविनाश घोगरे, कुणाल काळे, डॉ सुभाष गवारी, गणेश जामदार, डॉ वैशाली साखरे, रावसाहेब चक्रे आदी उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button