प्रतिनिधी : सौ जिजाबाई थिटे
पुस्तकमैत्री बुक गॅलरी राजगुरूनगर या ठिकाणी पुस्तकावर चर्चा , या उपक्रमांतर्गत *”मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा “* या पुस्तकावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून *द वर्ड ऑफ हॅप्पी रिलेशन्स* या संस्थेचे संस्थापक *प्रा. मुबीन तांबोळी* हे उपस्थित होते. ते बोलताना म्हणाले की, व्यक्ती व्यक्तीतील संबंध दृढ करण्यासाठी उत्तम संवादाची नितांत गरज आहे.
यशस्वीतेसाठी आपल्या आयुष्यात लोक जोडणे, सांभाळणे, जपणे फार महत्त्वाचे आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले. ते बोलताना पुढे म्हणाले की, स्वतःला शाबासकी द्यायला शिका, समोरच्या व्यक्तीला गृहीत न धरता महत्त्व द्यायला शिका, स्मित हास्यांनी बरेचसे प्रश्न सुटतात. समोरच्या व्यक्तीला काय अपेक्षित आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचा इंटरेस्ट ओळखून त्याच्याशी वागायचा प्रयत्न करा. सुगंध देणं हा फुलाचा गुणधर्म आहे ते कोणत्याही परिस्थितीत तो सोडत नाही. माणसाने तरी मानवता धर्म का सोडावा. दुसऱ्याचे मनापासून ऐकायचा प्रयत्न करा. समोरच्या व्यक्तीचं प्रामाणिकपणे कौतुक करा. असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा. मुबीन तांबोळी यांच्या ओघवत्या शैलीतील वक्तव्याने दोन तासांचा हा कालावधी उपस्थित वाचकवर्गास मंत्रमुग्ध करून टाकणारा होता.
पुस्तकमैत्री बुक गॅलरीच्या संचालिका सौ. मयुरी भवारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. अमोल वाघमारे डॉ. राहुल जोशी डॉ. निलम गायकवाड, कवयित्री मीनाक्षी पाटोळे श्री. नामदेव पडदुने, श्री. नारायण करपे श्री. मनोहर मोहरे डॉ. सारिका भगत, श्री. शिवराम केंगले, सुवर्णा धाडवड, प्रा. जयश्री बगाटे श्री. चंद्रकांत बोऱ्हाडे, कवी संदीप वाघोले, योगेश चव्हाण, साहेबराव पवळे आमोद गरुड, घुले सर, सौ. संगीता लोहकरे सौ. उषा वायाळ, अनुजा असवले तसेच डॉ. हनुमंत भवारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तृप्ती डावखर यांनी केले तर डॉ. गणेश सोनवणे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.