१) रस्त्यावर मधोमध पडलेले खड्डे २) धोकादायक गतिरोधक
गोलेगाव प्रतिनिधी:- चेतन पडवळ
शिरूर ते तर्डोबाचीवाडी या मार्गावर बसविण्यात आलेल्या सिमेंट गतिरोधकामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिरूर शहरापासून तर्डोबाचीवाडी मार्गावर काही अंतरावर सिमेंट चे काही ठिकाणी चुकीच्या पध्दतीने गतिरोधक टाकण्यात आले आहे. परंतु अशा गतिरोधकामुळे अनेक वेळा दुचाकी व अवघड वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच शिरूर शहरातून आलेल्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

यामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक असल्याने अनेक वेळा याठिकाणी किरकोळ अपघात होत असतात. एकीकडे मधोमध रस्त्यावर खड्डे व दुसरीकडे गतिरोधक असल्याने शालेय विद्यार्थी व शेतकरीवर्ग याना वाहन चालवतांना मोठी कसरत करावी लागत आहे.तरी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषद शिरूर यांनी या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे तसेच गतिरोधक काढण्यात यावे.अशी मागणी वाहन चालक करत आहे. तसेच शिवतारा पर्यटन स्थळ याठिकाणाहून येत असलेल्या मार्गावर गतिरोधक बसविण्यात यावे अशीही मागणी होत आहे.फोटोओळी…. शिरूर ते तर्डोबाचीवाडी या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून चुकीच्या पध्दतीने टाकण्यात आलेल्या गतिरोधकाचा वाहन चालकांना मोठा मनस्ताप होत आहे.