टाकळी हाजी (प्रतिनिधी)
टाकळी हाजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दुसऱ्या इयत्तेतील कु.आदिती स्वाती प्रश्नांत शिंदे हिने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत १५० गुणांपैकी १३६ गुण मिळवून राज्यात ८ वा क्रमांक मिळविला आहे,तिने पुणे जिल्ह्यात तिसरी तर टाकळी हाजी केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे,तिच्या यशाबद्दल परिसरातील शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे.नुकत्यात झालेल्या परीक्षेत तिने घवघवीत यश मिळविल्याबद्दल परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे,तिला मार्गदर्शन मुख्याध्यापिका मंगल गावडे यांनी केले असून तिच्या या यशाबद्दल माजी आमदार पोपटरावजी गावडे,सरपंच अरुणा घोडे,माजी उपसरपंच गोविंद गावडे,संत सेना महाराज नाभिक महामंडळाचे खजिनदार अनिल भानुदास शिंदे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण कांदळकर उपाध्यक्ष धनश्री संदिप गावडे यांनी अभिनंदन केले.