टाकळी हाजी (प्रतिनिधी)
डोंगरगण ता.शिरूर येथिल आदर्श शिक्षक नामदेव चोरे यांचे चिरंजीव अनुज नामदेव चोरे या दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत १५० पैकी १४८ गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे,तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सवंदगाववाडी केंद्र परसोडा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण घेत असून त्याची आई मनिषा या देखील शिक्षिका असून त्या त्याच्या वर्ग शिक्षिका आहे.त्याच्या या यशाबद्दल परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे,शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे, टाकळी हाजी गावच्या सरपंच अरुणा घोडे,उपसरपंच मोहन चोरे, कल्याणी उद्योग समूहाचे अशोक चोरे यांनी त्याचे अभिनंदन केले.