शुभम वाकचौरे
आपणा सर्वाना विंनतीपूर्वक कळविण्यात येते कि, शनिवार दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी. १० ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय, शिरूर, जि.पुणे येथे कालकथीत रंजना विलास शिशुपाल आणि कालकथीत अलका बाबासाहेब साबळे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त रुबी हॉल रक्तपेढी व डॉ मनोहर डोळे फाउंडेशन, नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडेशन आयोजित मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर, मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू उपचार व शस्त्रक्रिया आणि भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन मा. संजयजी शिरसाट मंत्री, सामाजिक न्याय, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी मा. अमोल मिटकरी – विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य मा. महादेव जानकर – राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष प्रेरणास्थान – मा. प्रविण विलास शिशुपाल – कार्यसन अधिकारी मंत्रालय, महाराष्ट्र राज्ययांची विशेष उपस्थिती असणार आहे.
सदर शिबिरामध्ये रुग्णांना औषधे व गोळ्या, तसेच नंबरचे चष्मे मोफत दिले जातील प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र स्मरणचिन्ह व भेटवस्तू दिली जाईल.लक्षात ठेवा रक्तदान हेच श्रेष्ठ दान…तुमच्या सहकार्यानेच मिळणार गरजूला जीवनदान… म्हणून जास्तीत जास्त संख्येने रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होऊन रक्तदान करावे. करुनी दान रक्ताचे..ऋण फेडू समाजाचे… तसेच सर्वांनी मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा…. कारण निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती….निरोगी समाजाचा आधार बनणार मी,होय आरोग्य शिबिरात सहभागी होणार मी…
..आयोजक व अध्यक्ष : मा. फिरोज भाई सय्यद | प्रविण शिशुपाल सोशल फाउंडेशन.========================