सरदवाडी प्रतिनिधी:- बाळासाहेब जाधव
गुरुवार दिनांक 23/1/2025 रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरदवाडी येथे केंद्र पुरस्कृत पंधरावा वित्त आयोग निधी मधून कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ब्युटी पार्लर व आरी वर्क प्रशिक्षण तसेच दिव्यांग पात्र लाभार्थींना चेक अनुदान वाटपाचा कार्यक्रम पार पडला.शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या पत्नी मनिषा ताई कटके यांच्या हस्ते सीसीटीव्ही लोकार्पण करण्यात आले. शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना चेक वाटप करण्यात आले.

शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेशजी केंजळे यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी सरदवाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच लक्ष्मीताई जाधव यांनी उपस्थित महिलांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिरूर पंचायत समितीचे सदस्य आबासाहेब सरोदे यांनी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य चांगल्या प्रकारे काम करत आहेत असे कौतुक केले तसेच अश्याच प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शन केले .शिरूर चे गटशिक्षणाधिकारी कळमकर साहेब यांनीही या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन केले. सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारीला आळा बसेल व महिला सुरक्षतेसाठी सीसीटीव्ही उपयुक्त ठरेल असे पोलीस निरीक्षक केंजळे साहेबांनी सांगितले. तसेच इथून पुढील काळात ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारचे काही सहकार्य लागले तर इथून पुढे सदैव तयार आहे असे मनीषा कटके यांनी सांगितले .कार्यक्रम प्रसंगी ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा चे शिरूर तालुकाध्यक्ष अरुण कुमार मोटे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरदवाडी ग्रामपंचायतिचे ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब बेंद्रे यांनी केले तर नितीन बेंद्रे (अध्यक्ष आदित्य बहुउद्देशीय विकास संस्था )यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम प्रसंगी शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री खोडदे साहेब हेही उपस्थित होते तसेच सरदवाडी गावचे उपसरपंच सोमनाथ सरोदे , सर्व ग्रामपंचायत सदस्य, अनेक महिला व मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक संदीप सरोदे सर यांनी केले तर आभार बाळासाहेब जाधव यांनी मानले.