शुभम वाकचौरे
जांबूत: ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जांबूत गावामध्ये कैवारी फाउंडेशन च्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले.शाळेतील मुलांना खाऊ वाटप करून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कैवारी फाउंडेशन च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असतात.पुणे पिंपरी चिंचवड पोलीस ईश्वर भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी भोसले बोलत होते की प्रत्येक मुलाला आनंदी आणि निरोगी जीवन जगण्याचा अधिकार आहे. अत्यावश्यक सेवांपासून किंवा सध्याच्या प्रचलित भेदभावापासून वंचित न राहता मुले त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास आणि निर्भयपणे बाहेरील जगाचा शोध घेण्यास पात्र आहेत. सेकंद निघून जाऊ शकतात, पण आठवणी कायम आपल्यासोबत राहतील. सध्या, तुमच्याकडे जीवन बदलण्याची शक्ती तसेच भविष्य घडविण्याची ताकद आहे. हा बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही.फक्त मुलांची कष्ट करण्याची तयारी असणे गरजेचे आहे.मुलांचे हक्क, शिक्षण आणि कल्याण याविषयी जागरुकता निर्माण केली पाहिजे.
यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस ईश्वर भोसले, कैवारी फाउंडेशन अध्यक्ष फुलसिंग मावळे, कैवारी फाउंडेशन उपाध्यक्ष कचर गायकवाड, प्रकाश खराडे, विजय संभेराव, बाळू शिनारे, पोपट चोरे, रामदास मेहेर, सुदाम साबळे, अरुण साबळे, कैलास कांदळकर, रवींद्र मेरगळ, दादाभाऊ मुसळे, शुभम गायकवाड, मयूर खराडे, अरुण भोसले, अमोल मेहेर, स्वप्निल थोरात, सुदर्शन भाकरे, संदेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.