शिरूर प्रतिनिधी :शकील मनियार

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुलामध्ये प्रजासत्ताक दिनाचा अमृतमहोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्सच्या प्रेसिडेंट नंदिता देशपांडे यांनी वरील मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक व रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे प्रेसिडेंट अजय लंके, दीपा लंके ,रोटरी क्लब ऑफ थेरगावचे प्रेसिडेंट दत्तात्रय कसाळे, महेश खामकर ,लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्सचे विनय देशपांडे ,विनायक केळकर जनसेवा सहकारी बँकेचे संचालक व ज्येष्ठ पत्रकार राजन वडके, आत्मजा फाउंडेशन च्या पदाधिकारी प्रियादर्शिनी गुरव व ऋचा वर्धे, डॉक्टर रंजना नवले नगरसेविका माया बारणे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे शाला समिती अध्यक्ष नितीन बारणे ,व्यवस्थापक अतुल आडे, मुख्याध्यापक नटराज जगताप,अश्विनी बाविस्कर,आशा हुले इ.मान्यवर तसेच पालक,विद्यार्थी,माजी विद्यार्थी आणि सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. बांधकाम व्यावसायिक अजय लंके यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.उपस्थित सर्व मान्यवरांनी भारतमाता पूजन केले.राष्ट्रगीत,ध्वजगीत,राज्यगीत,चापेकर स्तवन आणि संविधान उद्देशिका वाचन प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या आरंभी घेण्यात आले. यावेळी नंदिता देशपांडे यांनी त्यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी 11,000 /- रुपयाची देणगी दिली.तसेच डॉक्टर रंजना नवले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभ्यासू व गरजू विद्यार्थ्यांसाठी 51,000/- रुपयांची आर्थिक मदत दिली असून सहशिक्षिका शुभदा कानडे यांनी त्यांचे सासरे कै. बाळकृष्ण कानडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 5000/- रुपयांची देणगी शाळेला दिली. तसेच बांधकाम व्यवसायिक अजय लंके यांनी शाळेसाठी एक लाख रुपयांचे उत्तम दर्जाचे 30 बेंच विद्यार्थ्यांना भेट दिले असून लवकरच 200 बेंच देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ थेरगाव चे अध्यक्ष दत्तात्रय कसाळे यांच्या आर्थिक सहाय्यातून शाळेमध्ये उभारलेल्या व्यासपीठाचे पूजन त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना दत्तात्रय कसाळे यांनी ‘मेंदूचा पासवर्ड आत्मविश्वास आहे हे लक्षात ठेवा आणि डिजिटल व्यवस्थेचा चांगला वापर करा’ असा कानमंत्र विद्यार्थी व पालकांना दिला. तसेच 15 ऑगस्ट 2024 पासून ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ‘स्मरणगाथा क्रांतिकारकांची’ या उपक्रमाची लेखी परीक्षा घेऊन प्रत्येक वर्गातून प्रथम तीन क्रमांकांना आत्मजा फाउंडेशनच्या पदाधिकारी प्रियादर्शिनी गुरव व सहशिक्षिका सुनिता घोडे यांनी बक्षीस देऊन अरमान शेख, समर्थ सागरे,भूमिका खंडागळे, अंकिता धिवार, राजलक्ष्मी भोईर, केतन सांगडे, सुप्रिया ठोसर, वैष्णवी क्षीरसागर, दिव्या चिलखे, गजानन जाधव, समर्थ क्षीरसागर ,देवयानी ससाणे या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच यावेळी *’ स्मरणगाथा क्रांतिकारकांची’* या पुस्तकाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उपक्रमाचे प्रणेते ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांनी महिला क्रांतिकारकांना वंदन करत आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी, समाजासाठी करावा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय लंके यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.लोकमान्य टिळक माध्यमिक विभागातील अर्णवी अस्वले,श्रेयस बाकले या विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेत तर प्रसाद राठोड,रुद्र कदम,पूजा डुकरे,विद्या विटकरी या विद्यार्थ्यांना भौगोलिक सामान्यज्ञान स्पर्धेतील बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.तसेच बालविभागात पालकांसाठी आयोजित केलेल्या पाककृती स्पर्धेतील पूजा सोलंकी,मानवी खामगळ,पूजा कुमारी,छाया छिद्रे अशा विजयी पालक स्पर्धकांनादेखील गौरविण्यात आले.सहशिक्षिका प्रज्ञा फुलपगार यांनी गायलेल्या जयोस्तुते या गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले.विविध देशभक्तीपर, समुहगीते,जयतु अहिल्या अभिवादन गीत,देशभक्तीपर नृत्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे बालवाडी ते इ.९ वी. पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भारतमातेस अभिवादन केले.क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालक सदस्य आसराम कसबे लिखित ‘शिवगोंधळ’ गीत व नृत्यातून प्राथमिक विभागाने सादर केला. माध्यमिक विद्यार्थ्यांनी सादर केलेले मानवी मनोरे लक्षवेधी ठरले. श्रीयांश लकडे,अक्षरा रणपिसे ,सम्यक रुमाले,अनुज शिंदे,ऋतुजा विटकर,ऋतुजा अस्वले ,रुद्र कदम या विद्यार्थ्यांनी मराठी,संस्कृत,हिंदी,इंग्रजी अशा विविध भाषांमधून प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगितली.प्रभातफेरीतील तालबद्ध घोषपथक,विविध राज्यांचे प्रतिनिधीत्व करणारे वेशभूषेतील विद्यार्थी प्रभातफेरीचे आकर्षण ठरले.*’सुवर्ण भारत वारसा व विकास’* या संकल्पनेवर आधारित अमृतमहोत्सव प्रजासत्ताक दिनाचे मार्मिक फलकलेखन,आकर्षक कार्यक्रमपत्रिका,मनमोहकरांगोळी, अशा सर्वच पूर्वतयारीची उपस्थित मान्यवरांनी कौतुकाने दखल घेतली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता जोशी यांनी केले.तर सूत्रसंचालन सीमा आखाडे व केतन सांगडे यांनी केले आणि आभार मंजुषा गोडसे यांनी मानले.संपूर्ण वंदेमातरम गायनाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button