प्रतिनिधी जुन्नर
चार दिवसापासून जुन्नर तालुक्यामध्ये रात्री मिळणारी कृषी पंपासाठी ची आठ तास लाईट ही वीज वितरण कंपनीने दिवसा देत असताना त्यामध्ये दोन तास कमी केले आहे . त्यामुळे त्यांच्या मोटारी नदीवरती आहेत अशा शेतकऱ्यांना दोन तास लाईट कमी मिळत असल्यामुळे आणि त्यातच शेतकऱ्याची पिके भरत असून त्याचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसत आहे. जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेच्या वतीने वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनामध्ये शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज ही दिवसा आठ तास मिळावी ही प्रमुख मागणी शेतकरी संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष सचिन थोरवे यांनी केली आहे.
परंतु तालुक्यात काही ठिकाणी सुधारित वेळापत्रकानुसार कृषी पंपाची वीज देत असताना त्या ठिकाणी दोन दिवसापासून थ्री फेज कृषी पंपासाठी मिळणारी वीज ही कमी दाबाने मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी त्या ठिकाणी जळाल्या असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला असून काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी कांद्याला खत टाकून ठेवले परंतु थ्री फेज विजेच्या लपंडावामुळे त्याचे हजार रुपयाचे खत देखील वायाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे त्याला आर्थिक साधंड त्या ठिकाणी सोसावा लागेल त्यासाठी वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना सदरची वीज सुरळीत प्रमाणे द्यावी अशी विनंती वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून केली यावेळी वडज येथील विठ्ठलवाडी चे सरपंच किरण चव्हाण त्याचप्रमाणे आगर येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र महाबरे आणि जुन्नर तालुका युवा आघाडी शेतकरी संघटना अध्यक्ष सचिन थोरवे हे उपस्थित होते. यावेळी वीज वितरण चे उपअभियंता रोहिणी आंबेकर यांनी निवेदन स्वीकारले