शुभम वाकचौरे
आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेत मंगळवार १४ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. बालकांच्या पालकांना २७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार(आरटीई) कायद्या अंतर्गत वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. २५ टक्के विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना अदा केले जाते. मागील वर्षी प्रवेश प्रक्रियेत बदल केले. त्यानंतर पालकांनी न्यायालयात दाद मागितली. आणि प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागली. २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया १८ डिसेंबरपासून सुरु झाली. ७ जानेवारीपर्यंत शाळांना नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. आता १४ जानेवारीपासून पालकांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. २७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत आहे. मागील वर्षीच्या प्रक्रियेला लागलेला विलंब लक्षात घेत यंदा प्रवेश प्रक्रिया लवकर सुरु होत आहे.इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी https://student.maharashtra .gov.in/ adm_portal या वेबसाइट जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेकरीता विचारपूर्वक दहा शाळांची निवड करण्यात यावी. पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे. प्रक्रियेबाबत समस्या असल्यास मदत केंद्राशी संपर्क साधावा. अर्ज करताना अचूक माहिती भरावी. ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई अंतर्गत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करु नयेत. यासह निवासी, जन्म तारीखसह विविध घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे, कागदपत्रे तपासणी करण्यासाठी समितीची रचनाही शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केली आहे.
अधिक माहिती साठी संपर्क.- नाथाभाऊ पाचर्णे, राज्य संयोजक भारतीय बहुजन संघ.बहुजन मुक्ती पार्टी फिरोज भाई सय्यद -9561771423समाधान लोंढे -9822027087.सागर घोलप -7620388181.अशोक गुळादे -9890125452.सुदर्शन शिर्के मेजर -9881057587.