गोलेगाव प्रतिनीधी — चेतन पडवळ
गोलेगाव ता.१८ शिरूर तालुका बारामती जिल्ह्यात तर शिरूर तालुका शिवनेरी जिल्ह्यात याबाबतच्या चर्चेवर शिरूर तालुक्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, शिरूर तालुका फक्त पुणे जिल्ह्यात राहील यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतने २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभेत शिरूर तालुका पुणे जिल्ह्यातच हवा हा ठराव करावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिला आहे.
शिरूर तालुका बारामती तालुक्यातची बातमी असताना.आता काही बांधवांनी शिरुर तालुका शिवनेरी जिल्हयात असल्याचे पाठवले आहे. या संदर्भात योग्य पडताळणी करून शिरूर तालुक्यात मोठे जन आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशाराही भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिला आहे.
बारामती असो कि शिवनेरी दोन्ही ही नको पुणेच हवे. यासाठी शिरूर तालुक्यातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांना जाहीर आवाहन करत आहोत की २६ जानेवारी ला आपण ग्रामसभा घेत असतो. सुदैवाने २६ जानेवारी २०२५ जवळ आली आहे. सदर ग्रामसभेच्या विषय पत्रिकेवर शिरुर तालुका हा पुणे जिल्ह्यातच ठेवावा अन्य पर्याय आम्हाला मान्य नाही अशा प्रकारे ठराव मंजूर करून ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात यावेत. किंवा सर्व ग्रामपंचायतींचे ठराव एकत्र करून ते शिरुर तालुक्यातील एक शिष्टमंडळ तयार करून देण्यात येईल. तरी तमाम नागरीकांनी याची नोंद घेऊन आपल्या गावातील ग्रामसभेमध्ये हा ठराव मंजूर करून घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी केले आहे.