शिरूर तालुका प्रतिनिधी – शकील मनियार
नालंदा बुद्ध विहार सणसवाडी येथे तक्षशिला बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती उस्ताहत साजरी करण्यात आली.राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी तक्षशिला बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ घोडके,सचिव मालोजी भेदेकर,उपाध्यक्ष मोतीराम ( बाप्पू ) निकुंभ यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या अतुलनीय कर्तबगारीची माहिती उपस्थितांना दिली तसेच कु नव्व्या विनोद खंडारे व आर्यन विनोद खंडारे या बालकांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, पी डी सी बँकेचे माजी संचालक सुदाम दादा पवार,तक्षशिला बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ घोडके,सचिव मालोजी भदेकर,उपाध्यक्ष मोतीराम निकुंभ,सहसचिव हरिष गुडदे, सहखजिनदार दिलीप जाधव,सदस्य सुरज करंकाळ,राहुल वाघमारे,विनोद खंडारे,धनंजय कावरे,गुलाब वैराळ,जीवन भालेराव,सुभाष सोनवणे,जीवन अवचार,शैलेश सोनवणे,सचिन इंगळे,साहिल पवार,विपुल घोडके,दिव्यरत्न निकुंभ,अजित राईभोळे,पुनम घोडके,दिपाली करंकाळ, पुजा खंडारे,नव्व्या खंडारे,आर्यन खंडारे यांचेसह मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तक्षशिला बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ घोडके यांनी मानले तर आभार प्रदर्शन तक्षशिला बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे सचिव मालोजी भेडेकर यांनी मानले.