पुणे प्रतिनिधी
सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागामध्ये कार्यरत असलेले प्रा. तुषार काफरे यांना निर्वाण विद्यापीठाची पीएचडी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे.
ही पदवी निर्वाण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस सी एल गोदरा यांच्या हस्ते देण्यात आली.तुषार काफरे यांनी डॉ. निर्मल शर्मा व डॉ. अनिल वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली “टू डिझाईन अँड एनालिसिस ऑफ प्लांट डिसीज डायगोनोस्टिक युजिंग मशीन लर्निंग” या विषयावर संशोधन करून शोध प्रबंध सादर केला होता. विद्यापीठाचे रिसर्च विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजेश कासवान, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेले कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ.आलोक सिंग यांनी अभिनंदन केले.