शिक्षक लोकशाही आघाडी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे अध्यक्ष जी.के.थोरात व सचिव केरभाऊ ढोमसे यांचे हस्ते सन्मान स्वीकारताना प्रा. जितेंद्रकुमार थिटे.
शुभम वाकचौरे
पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी येथील श्री भैरवनाथ विद्यामंदिर व कनिष्ठ पाबळ महाविद्यालयाचे प्रा.जितेंद्रकुमार थिटे यांची अध्यक्षपदी तर वरवंड ता. दौंड येथील प्रा.सुनीलराजे निंबाळकर यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली.पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफ ची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. २०२४ ते २०२८ साठी त्रैवार्षिक नूतन कार्यकारणी महाराष्ट्र राज्य लोकशाही आघाडीचे सचिव केरभाऊ ढोमसे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली.
या जिल्हास्तरीय नूतन कार्यकारणीच्या निवडीसाठी निरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी.के थोरात,पुणे विभाग शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव कामठे यांनी काम पाहिले.सभेसाठी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे मावळते अध्यक्ष वसंतराव ताकवले,पुणे जिल्हा टीडीएफचे मुरलीधर मांजरे,महिला संघाचे अध्यक्षा स्वाती उपार,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अजीव सभासद प्राचार्य अनिल साकोरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा.जितेंद्रकुमार थिटे यांच्या निवडीबद्दल सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,उपाध्यक्ष सुधाकरराव जगदाळे,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर,सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे तज्ञ संचालक गुलाबराव गवळे,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रामदास थिटे,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश काशीद,कार्यवाह महेश शेलार,शिरूर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्षा प्रा.निर्मला संकपाळ,प्रा.प्रशांतकुमार माने, महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रा.शरद रणदिवे,प्रा.रतनकुमार ससाणे, प्रा.नानासाहेब गावडे,प्रा.सुदाम पोखरकर,पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल संघटनेचे अध्यक्ष अविनाश शेलार,सचिव अर्जुन आवारी,उपाध्यक्ष रत्नप्रभा देशमुख,प्रा हनुमंत तुपेरे,प्रा.विभा आबनावे,प्रा.किर्ती पेशवे,पुणे जिल्हा परिषदेचे विषयतज्ञ प्रदीप देवकाते,दत्तात्रय कुदळे,विवेक सावंत,गणेश कु-हाडे यांनी अभिनंदन केले.