जुन्नर तालुका प्रतिनिधी- सचिन थोरवे12
साहित्य क्षेत्र आणि कला, सामाजिक कार्य त्याच बरोबर आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा विकास या उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या वतीने आज दि. ५ जानेवारी २०२५ रोजी नाशिक येथील होरीझोन अकादमी येथे त्यांना विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार प्रदान करण्यात आला.:
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिकचे डॉ. महेंद्र देशपांडे, गुणवंत कामगार मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, संचालक राजेशजी उपासनी, मॉडेल व मिसेस मलेशिया इंटरनॅशनल डॉ. ज्योती केदारे-शिंदे, दैनिक सामानाचे मुख्य संपादक मनोजजी शिंदे, रोटरी क्लब चे अध्यक्ष ओमप्रकाशजी रावत, भाजप प्रवक्ते अजित चव्हाण,उत्तर महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी निशिगंधा कापडणीस, आदी मान्यवर उपस्थित होते.