जुन्नर प्रतिनिधी
जुन्नर तालुक्यात सध्या सुमारे साडेतेरा हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन उत्पादन घेण्यात आले आहे दरवर्षी सोयाबीन पीक लागवड क्षेत्रात वाढ होत आहे शासनाने सोयाबीनचा खरेदी दर 4892 रुपये प्रतिक्विंटल जाहीर केलेला आहे पण जुन्नर तालुक्यात सोयाबीन खरेदी केंद्र नसल्याने खाजगी व्यापारी 4000 ते 4100 हजार प्रति क्विंटल बाजारभावाने सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करताना दिसत आहेत.शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्यासाठी तात्काळ सोयाबीन खरेदी केंद्र जुन्नर बाजार समिती नारायणगाव,आळेफाटा,ओतूर उप बाजार समिती या सर्व ठिकाणी सुरू करण्यात यावे.आणि शेतकऱ्यांचे होत असलेले पिळवणूक व आर्थिक शोषण थांबवावे अशा आशयाचे निवेदन शेतकरी संघटने कडून जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे यांना दिले आहे. श्री.सचिन थोरवे तालुकाध्यक्ष जुन्नर युवा आघाडी शेतकरी संघटना यांनी जुन्नर बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे व नारायणगाव बाजार समितीचे सचिव शरद धोंगडे यांच्याबरोबर मागील काही दिवसापासून पाठपुरावा केला आहे.
आचारसंहितेचे शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलेही उल्लंघन न करता नम्रतापूर्वक आपणास देण्यात येत आहे. निवेदन देतेवेळी श्री.प्रमोद खांडगे पा. जिल्हाध्यक्ष पुणे अखिल भारतीय शेतकरी संघटना महाराष्ट्रराज्य आणि योगेश तोडकर मनसे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.