प्रतिनिधी : चेतन पडवळ
गोलेगाव ता.शिरूर येथील ग्रामपंचायत सरपंचपदी दिपाली तुषार पडवळ याची निवड झाली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत दिपाली तुषार पडवळ यांना सरपंचपदाची संधी मिळाली. सरपंचपदासाठी एकच अर्ज दाखल करण्यात आला होता. निवडणुक निर्णय अधिकारी यांनी एकच अर्ज असल्यामुळे ग्राह्य मंजूर केला. माजी सरपंच सुनिता सुरेश पडवळ यांनी सहा महिने सरपंचपदाचा पदभार सांभाळला.काल झालेल्या सरपंच पदाच्या निवडीत ठरविल्याप्रमाणे राजीनामा दिला . गेल्या सहा महिन्यामध्ये गावातील माजी सरपंच सुनिता पडवळ यांनी अनेक विकासकामे केली. गावचे युवा उद्योजक तुषार पडवळ याच्या नवनिर्वाचित सरपंच दिपाली पडवळ या पत्नी होत. नुकतेच ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या निवडीवेळी माजी सरपंच सुनिता वाखारे.माजी सरपंच सरपंच सुनिता पडवळ उपसरपंच निलेश बांदल.सारिका इंगळे.दिलीप पडवळ.बबन मांढरे ग्रामसेवक पोपट बारहाते ग्रामपंचायत कर्मचारी सुरज माकर. वृशाली वर्पे.कमल पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.निवडणुक निर्णय अधिकारी मंडलधिकारी साळवे कामगार तलाठी अंकुश सुपे यांनी निर्णय दिला.