शिरूर तालुका प्रतिनिधी: शकील मनियार
============ बेल्हे गावचा तमाशा महोत्सव 27 नोव्हेंबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत आहे .यावर्षी तमाशा महोत्सवात प्रसिद्ध ‘सनई’ सम्राट दत्ता गायकवाड यांच्या ‘सनईच्या’ आवाजाने तमाशा महोत्सवात अधिक रंग भरणार आहे. “दत्ता गायकवाड यांची सनई वाद्य कला म्हणजे जशी सनई तसा आवाज”! दत्ता गायकवाड हे प्रसिद्ध सनई सम्राट आहेत. युट्यूबच्या प्रसार माध्यमातून त्यांचे ‘सनई’ वाद्य संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे. दत्ता गायकवाड हे आंबेगाव तालुक्यातील अवसरी बु|| या गावचे रहिवासी आहेत. गायकवाड हे इयत्ता पाचवी शिकलेला हा कलावंत आहे . बालपण अतिशय हलाखित गेलेले.आणि आर्थिक परिस्थिती बेताची असलेला. आणि कुठल्याही शास्त्रीय संगीत शाळेत न गेलेला. हा कलावंत आहे.
हा शास्त्रीय संगीतापासून लोकधरेपर्यंतची सर्व मराठी गाणी ,हिंदी गीते, लावण्या, नाटकातील पदे , भाववगिते, शाहीरी पोवाडे, अभंग, यासारखे मूळ गाण्याच्या संगीताप्रमाणे ‘सनईच्या’ स्वरातून कला सादर करणारा कलावंत आहे. या हरहुन्नरी कलावंतांच्या सनई वाद्याने या वर्षाच्या बेल्हा तमाशा महोत्सवात अधिकचा रंग भरणार आहे . ही महाराष्ट्रातील रसिकांना पर्वणी आहे. बेल्हा तमाशा महोत्सवाचे प्रणेते वसंतराव जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी प्रत्येक वर्षी बेल्हा तमाशा महोत्सवाचे अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन करतात. हा बेल्हा तमाशा महोत्सव फक्त पुणे जिल्हा पुरता न राहता. त्याची प्रसिद्ध महाराष्ट्रात झालेली आहे. बेल्हे तमाशा महोत्सवाचा रंगमंच म्हणजे नवोदित कलाकार ,तमाशा अभ्यासक, ज्येष्ठ तमाशा कलावंत, तमाशा रसिकांना मुक्त आनंद घेण्याचे मुक्त विद्यापीठ ठरत आहे.
या तमाशा महोत्सवाचे प्रणेते वसंतराव जगताप हे नेहमी नवीन नवीन लोककला आणि लोक कलावंत शोधून त्यांना संधी देतात. हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. दत्ता गायकवाड यांच्या ‘सनईच्या’ वाद्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागातून त्यांचा सन्मान आणि सत्कार तसेच विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. सन 2020- 21 झी मराठी 24 तास या वाहिनीने दत्ता गायकवाड यांच्या सनई वाद्य कलेची दखल घेतली होती.त्यांना सनई कला सादर करण्याची संधी दिली होती.