*++++++++++++++ शब्दांकन*काशिनाथ आल्हाट*

*तमाशा अभ्यासक* तमाशा पंढरी नारायणगाव 8830857875

भाग= 3======.=…..==..

शिरूर तालुका प्रतिनिधी : शकील मनियार

ग्रामीण भागातले दत्ता गायकवाड सारखे गुणवंत कलावंत . दैवी कलेसाठी प्रचंड मेहनत घेतात.असे म्हटले जाते , ‘”आनंदाकडे आनंद जातो’. आणि ‘दुःखाकडे दुःख जाते’. असे म्हटले तरी दुःखाने दुःख नाहीसे होत नाही. तर ते आनंदाने नाहीसे होते. आनंदाचे दुसरे जर नाव काय असेल?. तर ‘सनई.’ आणि ‘सनई’ म्हणजेच दत्ता गायकवाड . दत्ता गायकवाड हे भविष्यात ‘भारतरत्ना’पर्यंत पोहोचल्या शिवाय राहणार नाही .ही महाराष्ट्रातील तमाम रसिकांची मनातील इच्छा आहे. दत्ता गायकवाड यांना सनईकलेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक संस्था, संघटनांच्यावतीने विविध पुरस्काराने त्यांना सन्मान करण्यात आले आहे. ‘ झी टीव्ही 24 तास वाहिनीने त्यांची दखल घेतली. सन 2020 – 21 मध्ये झी टीव्हीच्या मंचावरती त्यांच्या सनई वादनाचा कार्यक्रम झाला .

उभ्या महाराष्ट्राने उत्तम प्रतिसाद दिला.ज्या ज्या ठिकाणी कला महोत्सव होतात. त्या त्या ठिकाणी दत्ता गायकवाड यांचा सनई वादनाचा प्रथम क्रमांक ठरलेला असतो. असा हा नवोदित गुणवंत कलावंत सनई वाद्याच्या रूपाने महाराष्ट्रभर नावारूपाला येत आहे.सनई सम्राट सनई वाद्याचा जादूगार दत्ता गायकवाड अवसरीकर. महाराष्ट्रातील तमाम रसिकांकडे एकच इच्छा अपेक्षा आहे. की ,ज्या ज्या ठिकाणी दत्ता गायकवाड यांना सनई वादन करण्याची संधी द्याल .त्या त्या ठिकाणी दत्ता गायकवाड यांचा नावलौकिक होईल . आणि भविष्यातील स्वप्नं साकार होईल.दत्ता गायकवाड हा खऱ्या अर्थाने एक निस्वार्थी कलाकार आहे .स्वतः दत्त हा उत्तम दर्जाचा सनई वादक जरी असला .तरी स्वतःची कला स्वतःभोवती न ठेवता .ती इतरांना दान म्हणून त्याने अनेकांना सनई कलावंत घडविले आहेत.सनई वाद्य शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे .त्याच्या हातून अनेक सनई वाद्य वाजवणारे गुणवंत कलावंत तयार झाले आहेत . याशिवाय आपल्या पाठीमागे आपली सनईची कला हे जिवंत राहावी. यासाठी गायकवाड यांनी स्वतःचा मुलगा संजीवन सनईदार तयार केलेला आहे. एखाद्या दुसऱ्या कार्यक्रमात दत्ता गायकवाड स्वतःच्या मुलाबरोबर सनई वाजवतात .आणि त्या ठिकाणी रसिकांना आनंद देतात. काम करतात .’बाप लेकाची ‘जुगलबंदी’ पाहण्यास मिळते. रसिक ते ऐकून तृप्त होतात . रसिकांना ती खरी पर्वणी ठरते. आणि ‘बाप से बेटा सवाई’ याची खात्री होते. अशा कार्यक्रमातून पैशाच्या पावसापेक्षाही टाळ्यांचा कडकडाट याच्यात धन्यता मानणारे बापलेक आहेत. रसिकांमधून टाळ्यांचा गजर होतो.

महाराष्ट्रात ही लोककला पारंपारिक पद्धतीने गावगाड्या पासून हे चालत आलेली आहे . या लोककलेचे शासनाच्या माध्यमातून संवर्धन झाले पाहिजे.पारंपरिक कला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे. मंगल कार्याचा एक घटक आहे .अलीकडे कालखंडात पारंपरिक कलावंतांची निर्मिती होत नाही.कारण पारंपरिक कला ही जगण्यापुरती कला आहे. त्यातून परिवाराचा विकास होत नाही.त्यामुळे नवीन कलाकार हा पारंपरिक कलेपासून दूर गेला आहे . त्यामुळे दत्ता सारख्या अनेक गुणवंत कलावंतांनी उदरनिर्वाहासाठी शहराची वाट धरली आहे. ज्यावेळी कोरोना सारखी भयानक आपत्ती निर्माण होते .त्यावेळेस या लोककलावंतांची उपासमार होते. अशावेळी ही लोककला जतन करण्यापेक्षा वेगळा व्यवसाय करण्यावरती ही लोक कलावंत भर देतात. असे झाले. तर महाराष्ट्राची लोककला लोप पावेल “सनई सम्राटाच्या मुखात दात आहेत. तोपर्यंत त्याची सनईची श्रीमंती असते”. मुखातले दात पडू लागले. की, उन्हाळ्यातील झाडांची पाने गळू लागल्यानंतर त्या रुक्ष झाडाकडे कोणी पहात नाही.त्याप्रमाणे सनई सम्राटाची अवस्था होते. ते झाड रुक्ष होवू नये. यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

‘”ज्या हातांच्या बोटानी सनईच्या कांड्यावरील सप्तसुरांची उधळण केली होती”. तिच बोटे जमिनीला भूकंप व्हावा.त्याप्रमाणे थरथर कापू लागतात.’ मनगटातील बळ कमी होते. अन बुध्दीबळाचा डाव संपलेला असतो. अशा वेळी दत्ता गायकवाड या सनईच्या जादूगाराची किंमत महाराष्ट्राला आणि रसिकांना समजेल. एकेकाळी रसिकांना मंत्रमुग्ध करणारा सनईचा जादूगार आज ‘सनईकडे’ टकमक बघत म्हणेण.’सनई ‘हिच माझी श्रीमती होती.गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button