शिरूर तालुका प्रतिनिधी :शकील मनियार

काजल ही सूरज चव्हाण ची खरी बायको नसून, ती त्याची वेब सिरीज मधील एक पार्टनर आहे . जिने त्याला छोट्या पडद्यावर काम दिले कोणी त्याच्या सोबत ॲक्टिंग करायला तयार होत न्हवते तेव्हा तिला त्याची परिस्थिती माहिती असल्यामुळे तिला त्याच्या बद्दल आपुलकी निर्माण झाली व तिने त्याला एक चांगली मैत्रीण म्हणून साथ दिली समजून सांगितले, हा त्यांचा व्हिडिओ सोशल midea वर खूप viral होत असताना काजल म्हणली की तो बिग बॉस show जिंकला याचा तिला खूप आनंद झाला व त्यामुळे ती त्याच अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी गेली असताना काजल त्याच्या सोबत फोटो काढत होती आणि तिने सहज सूरज ला विचारले की काय सूरज आता विसरलास का मला , तेव्हा सूरज त्यावर तिला म्हणाला की तू तर माझी हिरोईन आहेस . त्याला अस म्हणायचं होत की तू माझ्या वेब सिरीज ची हिरोईन आहेस पण , social media वर हा व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी viral करून खूप अफवा पसरवल्या आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत.

तीच म्हणणं आहे की जशी ती अगोदर सूरज ला सपोर्ट करत होती तशीच यापुढे पण करेल खर तर सूरज ला आता सपोर्ट ची गरज नाहीये पण तरीही कधीही सूरज ने तिला हाक मारली तरी ती त्याच्यासाठी कायम एक चांगली मैत्रीण आणि त्याची हितचिंतक म्हणून उभी राहील. बऱ्याच अशा कमेंट होत्या की यांनी सूरज च्या जीवावर पैसे कमवले खर तर काजल म्हंटली की त्याच्याजिवावर पैसे कमवायला तीच तेव्हा यू tube चॅनल न्हवत तीच दुसऱ्यांकडे पर day ने काम करत होती आणि त्या सरांशी बोलून काजल ने तिच्या सोबत सूरज ला ही काम दिले . आणि नंतर त्याच चॅनल वर continue दोघांनी दीड वर्ष सोबत काम केले त्यामुळे त्याला जितके पैसे मिळायचे तितकेच काजला ही मिळत होते .

आणि ती स्वतः कितीतरी वेळा सूरज ला म्हणली होती की तुझं account काढून देऊन त्यात पैसे टाकत जाऊ का तर त्यावर सूरज म्हणायचा की मला त्यातल काय काळत नाही मला पैसे काढायला गेल्यावर लोक फसवतीन मी सारखं सारखं नाही जाऊ शकत तू कॅश च देत जा आणि काजल ते पैसे मोजून त्याच्या आत्त्याला सांगून त्याच्याकडे देत असायची हे फक्त ती यामुळे करायची की जी सूरज ने त्याची परिस्तिथी बिग बॉस च्या घरात सांगितली त्याने तीच परिस्तिथी अगोदर काजल ला सांगितलेली होती म्हणून ती म्हणली की त्याची परिस्तिथी आईकुन जर महाराष्ट्राला त्याच्या बद्दल आपुलकी वाटली तशीच पहिल्यांदा तिला सगळ खर समजल्यानंतर तिलाही त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली होती ती म्हणते की सूरज हा खूप साधा , सरळ , आणि निस्वार्थी मुलगा आहे हे तिला पहिल्यापासूनच माहिती आहे आणि त्याने अजून खूप पुढे जावे ही त्याची इच्छा आहे आणि त्याच्या लग्नाचा विचार केला तर ती म्हणते की तो त्यांच्या घरच्यांचा प्रश्न आहे आणि सुरजच पहिल्यापासूनच स्वप्न आहे की त्याला अनाथ मुलीशी लग्न करायचं आहे . त्याच्या घरचे त्याच्यासाठी त्याला हवी तशी चांगली मुलगी शोधतील ज्यामुळे त्या अनाथ मुलीच्या ही आयुष्याचं कल्याण होईल आणि ती स्वतः अनाथ असल्यामुळे तिला त्या आणाथ पणाची जाणीव असेल आणि ती सूरज ला चांगला जीव लावेल. काजल म्हणते आज ना उद्या माझं ही लग्न होणार आहे त्यामुळे मी त्याच्यासोबत कायम राहू शकत नाही पण त्याचे कुटुंब त्याच्यासाठी जो निर्णय घेतील तो योग्यच असेल कारण कोणाच्याच घरचे कधी वाईट विचार करणार नाहीत. तिला फक्त त्याची मैत्रीण म्हणूनच राहायला आवडेल आणि ती म्हणते की कधी त्याने अडचणीच्या वेळी हाक मारली तरी ती त्याच्या साठी उभी राहील.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button