** ++++++++++++++ शब्दांकन*काशिनाथ आल्हाट*
*तमाशा अभ्यासक*
तमाशा पंढरी नारायणगाव 8830857875 भाग= 2======== ====
शिरूर तालुका प्रतिनिधी: शकील मनियार
दत्ता गायकवाड कोणत्याही संगीत शाळेत गेला नाही. अथवा संगीत विशारद सारख्या परीक्षांना सामोरे गेलेला नाही. दत्ता गायकवाड यांना जन्मतः सरस्वतीचे वरदान लाभले . प्रतिभेने मायेची पाखरण केली आहे . एखाद्या वेळेस रस्त्याने जर एखादी व्यक्ती घाई घाई गडबडीत जात असेल . आणि त्याच्या कानावर हे दत्ता गायकवाडच्या सनईचे स्वर पडले .तर न कळत त्याचे पाय विसावा घेतल्याशिवाय राहत नाहीत. अशी किमया दत्ताच्या ‘सनई’ वाद्यात आहे. दत्ता गायकवाड यांचे ‘सनई’ वादन सार्वजनिक आनंद महोत्सव, सनई चौघडा,लग्नकार्य वाढदिवस ,वास्तूशांती, राजकीय नेत्यांचे विजयी उत्सव, यात्रा जत्रा, कुस्त्यां, बैलगाडी शर्यत अशा अनेक कार्यामध्ये दत्तक गायकवाड यांच्या सनईच्या वाद्याला पहिली पसंती असते. ‘खर तर !’ लहान मोठ्या कार्यक्रम गायकवाड यांच्या सनई वाद्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात पसंती ही सामान्य माणसापासून आमदार , खासदार मंत्रीमहोदय पर्यंत असते.
आपल्या घरात कोणतेही मंगलकार्य असू देत . ‘सनई हे प्रथम मंगल वाद्य आहे’ . ते वाजविले जाते. ‘मंगल वाद्य ‘म्हणून ओळखले जाते. दत्ता गायकवाड हे सनई वाद्यातून मराठी गाणी,हिंदी गीते,भावगीते, नाटकातील पदे , लावणी,अभंग हे त्यांचे अतिशय प्रसिद्ध झालेली आहेत. रसिक त्यांचे चाहते आहेत. त्यापैकी ,’एक राधा एक मीरा ‘ ,’पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची,’ ‘ लंबी जुदाई ‘, ‘माझ्या कातड्याचा जोडा शिवावा’, ‘दे रे कान्हा चोळी आणि लुगडं’, ‘पाखरा आझाद केले मला’, ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ या अभंग, गवळणी अशा एक ना अनेक कितीतरी गाणी ,गीते आज रसिकांच्या ओठावरती आहेत. ती केवळ दत्ता गायकवाड यांच्या सनईची जादू म्हटले. तर वावगे ठरणार नाही.’असे म्हणतात , ‘सिंहाला पाहावे वनात, आणि दत्ताला पहावे सनईच्या वाद्यनात.” भारतरत्न बिस्मिल्लां खान यांनी लोककलेला जागतिक दर्जा मिळवून दिला. ते भारतीय सनई कलेचे जेष्ठ श्रेष्ठ सनई कलावंत म्हणून साऱ्या भारताला परिचीत आहेत. जुन्या पिढीतील लोककलावंत ‘भारतरत्न’ बिस्मिल्लां खान यांनी सनईच्या वाद्याचे महत्त्व संपूर्ण भारत देशाला पटवून दिले. लोकवाद्यात अभिजात संगीत वाद्याला सनईला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्याचे काम त्यांनी केले . ते केल्यानेच, बिस्मिल्लां खान यांना ‘भारतरत्न’ हा किताब प्राप्त झाला. त्यांना भारत सरकारने भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्याच प्रमाणे इतरही काही सनई वाद्य घराणे आहेत . त्यापैकी कलाकार जाधव ,गायकवाड ,बिलायेत, देवळाणकर, नंदलाल ही घराणी सनई क्षेत्रात अग्रेसर आहेत. माळरानावरती नाजूक नाजूक फुले उमलावीत आणि त्यांनी रंगांची उधळण करून माणसांची मने डोलावेत . या पद्धतीने अवसरीच्या गाव कुसा बाहेर माळरानावरती दत्ता गायकवाड यांच्या रुपाने सनईचे स्वरांचे सुगंधी फुल उमलले. त्याचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रात दरवळत आहे. माणसांची मने हे डोलत आहेत. ‘ जाई ,जुई, मोगरा, सायली, दिसायला जरी नाजूक फुले असली’ . पण त्यांचा गंध दूरवर दरवळत राहतो .फुलांचा जीव जरी लहान असेल .पण सुगंधाचे उधळण दूर अंतरापर्यंत असते. त्या पद्धतीचे जगणे दत्ता गायकवाड यांचे आहे . दत्ता गायकवाड यांची आर्थिक परिस्थिती जरी नाजूक असली .तरी सनईच्या स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दत्ताचा परिचय करुन दिला.जाई जुईचा सुगंध वाऱ्याच्या लहरीप्रमाणे ज्याप्रमाणे दरवळतो .त्याप्रमाणे दत्ता गायकवाड यांच्या सनईचा स्वर वाऱ्याच्या लहरींनी आज महाराष्ट्रभर गेलेला आहे .महाराष्ट्राच्या सीमा ओलांडत आहे. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा डोक्यावर मोरपीस आणि हातात बासरी प्रिय होती. बासरी आनंदाचा एक प्रकार आहे .आनंदाचे प्रतीक आहे.माणसांचे मन आनंदी ठेवणारे वाद्य आहे .ज्याप्रमाणे बासरी ही सरळ कांड्याची असते.तिला कुठे ही गाठ नसते . त्याच पद्धतीने सनई वाजवणाऱ्या कलाकारांची मने असतात. त्याला दत्त गायकवाड सुद्धा अपवाद नाही .आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्याला पैसे किती मिळेल ?हे महत्त्वाचे नाही. तर अनेकांच्या चेहऱ्यावरचा स्वच्छ आनंद आपल्याला कसा घेता येईल ?.यांचं भाग्य आपणास मिळालेले आहे . ते समाधान दत्ता गायकवाड यांच्या चेहऱ्यावरती असते. गायकवाड यांचे सनई वादन म्हणजे ,”असंख्य काळजाच्या वेदनांचा झंकार म्हणावा लागेल”!. ज्याप्रमाणे बिग बॉस मधील सुरज चव्हाण परिस्थितीने गांजलेला होता. खेड्यातला मुलगा हा महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातील ताईत ठरला . त्या घटनेवरून आपल्या लक्षात येते की, आई-वडिलांची पुण्याई , , स्वतः मेहनत करण्याची जिद्द असेल. तर रात्रीतून आयुष्य बदलते. हे सुरज चव्हाण यांचे उदाहरण नजरेसमोर आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागातला गुणवंत कलावंत . दैवी कलेसाठी प्रचंड मेहनत घेतात.असे म्हटले जाते , ‘”आनंदाकडे आनंद जातो’. आणि ‘दुःखाकडे दुःख जाते’. असे म्हटले तरी दुःखाने दुःख नाहीसे होत नाही. तर ते आनंदाने नाहीसे होते. आनंदाचे दुसरे जर नाव काय असेल?. तर ‘सनई.’ आणि ‘सनई म्हणजेच दत्ता गायकवाड .” दत्ता गायकवाड हे भविष्यात ‘भारतरत्ना’पर्यंत पोहोचल्या शिवाय राहणार नाही .ही महाराष्ट्रातील तमाम रसिकांची मनातील इच्छा आहे. दत्ता गायकवाड यांना सनईकलेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक संस्था, संघटनांच्यावतीने विविध पुरस्काराने त्यांना सन्मान करण्यात आले आहे. ‘ झी टीव्ही 24 तास वाहिनीने त्यांची दखल घेतली. सन 2020 – 21 मध्ये झी टीव्हीच्या मंचावरती त्यांच्या सनई वादनाचा कार्यक्रम झाला .
उभ्या महाराष्ट्राने उत्तम प्रतिसाद दिला.ज्या ज्या ठिकाणी कला महोत्सव होतात. त्या त्या ठिकाणी दत्ता गायकवाड यांचा सनई वादनाचा प्रथम क्रमांक ठरलेला असतो. असा हा नवोदित गुणवंत कलावंत सनई वाद्याच्या रूपाने महाराष्ट्रभर नावारूपाला येत आहे.सनई सम्राट सनई वाद्याचा जादूगार दत्ता गायकवाड अवसरीकर. महाराष्ट्रातील तमाम रसिकांकडे एकच इच्छा अपेक्षा आहे. की ,ज्या ज्या ठिकाणी दत्ता गायकवाड यांना सनई वादन करण्याची संधी द्याल .त्या त्या ठिकाणी दत्ता गायकवाड यांचा नावलौकिक होईल . आणि भविष्यातील स्वप्नं साकार होईल. क्रमशः भाग=3