प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
* माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी ता.आंबेगाव आणि पुणे जिल्ह्यामधील शैक्षणिक आणि सामाजिक कामामधील एक अग्रगण्य संस्था म्हणून जिल्ह्यामध्ये लौकिक आहे.अल्पावधीमध्ये सदर विकास प्रबोधिनी मार्फत १२ कोटी रुपयांच्या भौतिक सुविधा निर्मिती करून पुणे जिल्ह्यातील एक शैक्षणिक हब त्यामध्ये चाळीस हजार वृक्ष लागवड स्विमिंग टॅंक,प्रशस्त उद्यान,ई लर्निंग,सुसज्ज संगणक लॅब,तसेच प्रबोधिनी मधील कार्याचा ध्यास घेतलेले विद्यालयातील निवृत्त हाडाचे शिक्षक अरुण बाबुराव साकोरे यांनी अविरत केलेल्या कामाचे प्रतीक म्हणून २८ मुले जिल्हास्तरावर वेगवेगळ्या खेळांमध्ये निवडले गेले आहेत.खऱ्या अर्थाने विद्याधम प्रशाला लोणी ता. आंबेगाव या ठिकाणाहून निवृत्ती नंतरही ज्यांनी गावांसाठी आणि शाळेसाठी आपल्या जीवनातील १२ तास वेळ दिला त्यामुळे शाळेचा आणि गावचा शैक्षणिक चेहरा बदलण्यात आला.
याची दखल प्रबोधिनीने घेऊन ज्यांच्या अविरत कष्टामधून हे अतिउच्च शिखरावरील यश मिळत आहे याची दखल घेत अरुण बाबुराव साकोरे सर यांची संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड केली आहे या निवडीला समस्त ग्रामस्थ केंदूर तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे अजीवसेवक प्राचार्य अनिल साकोरे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सोमनाथराव भंडारे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणेचे उपाध्यक्ष प्रा. जितेंद्रकुमार थिटे आणि तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.