प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
दौंड तालुका माध्यमिक शिक्षक संघ,दौंड तालुका शिक्षक लोकशाही आघाडी, दौंड तालुका महिला शिक्षिका संघ,उच्च माध्यमिक शिक्षक संघ व सेवानिवृत्त शिक्षक संघ यांचीही नूतन कार्यकारणी निवड करण्यासाठी सहविचार सभा समाजसेवक जेधे इंग्लिश मेडियम स्कूल बोरी पारधी (चौफुला) येथे जी.के.थोरात सर कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या अध्यक्षतेखाली व संजय वाबळे सर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.पंकज घोलप सचिव पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ,धर्मेंद्र देशमुख कार्याध्यक्ष पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ,अशोक दरेकर उपाध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी हे निरिक्षक म्हणून उपस्थित होते.
जाहिरात
दौंड तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनिल ताकवणे सर,दौंड तालुका शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष नामदेव खडके,दौंड तालुका महिला शिक्षिका संघ अध्यक्ष नीता हंडाळ /टेंगले,उच्च माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अजित गोरे,सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष राजेंद्र रंधवे यांची निवड करण्यात आली.दौंड तालुक्यातील मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका, सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.