स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज केंदूर येथे मातृभूमिच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे शुरवीर केंदूरचे सुपूत्र किर्तीचक्र प्राप्त शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या जयंतीनिमित्त विदयार्थ्यांना त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा,त्यागाचा, शौर्याचा परिचय व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, देशाविषयीच्या कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रबोधन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी प्रतिपादन केले.
तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच आपल्या कला जोपासता यावी या उद्देशाने चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली.१५ जून २००० रोजी जम्मू काश्मीरच्या पूँछ या सीमेलगतच्या भागात मेजर प्रदीप ताथवडे यांना गुप्त संदेश प्राप्त होताच मोजक्या जवानांचे विशेष कृती दल घेऊन घनदाट अरण्यात सतत दोन दिवस अतिरेक्यांचा माग काढून दोन अतिरेक्यांना यमसदनी धाडले.त्यावेळी झाडीत लपलेल्या अफगाणी अतिरेक्याने पाठीमागून हल्ला केला त्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत मेजर प्रदीप ताथवडे यांच्या मांडीत चार-पाच गोळ्या लागल्या.अशा अवस्थेत लढत तिस-या अतिरेक्याचा खात्मा केला.जखमेतून अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्यांची शुद्ध हरपली व त्यांना वीरमरण आले.शहीद मेजर प्रदीप ताथवडे या शूर,देशप्रेमी वीराला १७ जून २००० रोजी अत्यंत शौर्याने लढून वीरमरण आले.अशा या देशप्रेमी सुपूत्राच्या जयंतीदिनी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मातृभूमिच्या रक्षणासाठी स्वत:च्या कर्तृत्वाने अमर झालेल्या या महान वीरपुरूषाचा परिचय होण्यास मदत झाली.शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांचे व्यक्तीचित्र,त्यांचे बालपण,त्यांच्या जीवनातील एक प्रसंग किंवा देशभक्तीपर चित्र या विषयावर चित्रकला स्पर्धा अ गट (इ. ५ वी ते इ.७ वी ) व ब गट (इ.८ वी ते इ.१० वी) अशा दोन गटात घेण्यात आली.विजेते स्पर्धक यांचा स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र व रोख बक्षिस देऊन गुणगौरव करण्यात आला. अ गटातून ८५ तर व ब गटातून ७६ असे मिळून १६१ विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला.’अ’ गटातून आराध्या स्वप्निल थिटे हिने प्रथम, आराध्या अविनाश थिटे हिने द्वितीय,तन्मय मनेश थिटे याने तृतीय तर समर्थ ताराचंद राऊत याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून यश संपादन केले.
‘ब’ गटातून अन्ययी राजेश थिटे हिने प्रथम अविनाश सतिश सुक्रे याने द्वितीय,अनुष्का योगेश लिमगुडे हिने तृतीय तर अपेक्षा मदन प-हाड हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून यश संपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करताना विद्यालयाचे प्राचार्य श्री ए.टी.साकोरे यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांना समस्त ग्रामस्थ केंदूर आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या वतीने विनम्र अभिवादन केले . डोळ्यात तेल घालून अहोरात्र देशाच्या रक्षण करणारे वीर जवानामुळेच आपण सर्वजण सुरक्षित आहोत असे वीर जवानाबद्दल गौरवोद्गगार काढले .चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व स्पर्धेचे नियोजन कलाशिक्षक संजय जोहरे यांनी केले.समाजातील महापुरुषांचा आदर्श घेऊन त्यांचे विचार आपल्यात आत्मसात करून आदर्शवत जीवन जगावे असे विचार उत्तमआण्णा भोंडवे यांनी व्यक्त केले तर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.दीपरतन गायकवाड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की आपण आधुनिक जीवनशैलीत शिस्तीचे भान ठेवून प्रगतीचा आलेख उंचावत ठेवणे गरजेचे आहे.आई वडील व ज्येष्ठ ज्येष्ठांचा आदर करून विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख निर्माण करण्याची गरज देखील त्यांनी बोलून दाखवली्.
वाहतुकीचे नियम देखील यावेळी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.वाहन परवाना असल्याशिवाय वाहने चालवू नयेत, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, विद्यार्थी विद्यार्थिनिंच्या काही तक्रारी असतील तर पोलीसांना मित्र समजून त्या आमच्याकडे व्यक्त कराव्यात असे आवाहन केले.या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी बाळासाहेब कंद (माजी अध्यक्ष शिरूर हवेली प्रासादिक दिंडी)विलास तात्या खांदवे (माजी अध्यक्ष शिरूर हवेली प्रासादिक दिंडी)सुदामराव सातारकर (माजी शिक्षण विस्तार अधिकारी)विदयालयाचे प्राचार्य ए. टी.साकोरे,सरपंच अमोल थिटे,रामशेठ साकोरे,सतिश थिटे( अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती)शिक्षक महादेव पाटील,राजु पानमंद,रमेश गावडे,रविंद्र उघडे,प्रशांत गलांडे,प्रशांत गांजरे,सुरेश गायकवाड,संजय सुरवसे,चंद्रकांत थिटे,प्रतिभा शिर्के,नंदुलाल बहिरम,निरंजन शिंदे,शिक्षकेत्तर सेवक शिवाजी ताथवडे, मनोज दोंड,अजाबराव बुंदे,संपत लोढे,कैलास मुंढे,संतोष भालेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंद्रकांत थिटे यांनी केले, तर आभार दशरथ सुक्रे यांनी मानले.