= शब्दांकन =काशिनाथ आल्हाट भाग 10 वा======.=======*निवृत्ती महाराज गायकवाड यांच्या सहवासाने कै नामदेव उनवणे परिवाराला सुवर्णकाळ.
शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
ह .भ .प .निवृत्ती महाराज गायकवाड यांनी तीर्थक्षेत्र पंढरपूर आणि आळंदीची 66 वर्ष पायी वारी केली.27 वर्ष दिंडी सोहळा केला .याशिवाय अनेक ठिकाणी प्रवचने, कीर्तने केली. याद्वारे त्यांनी समाजप्रबोधन केले. ज्याप्रमाणे बहुजन समाजातील अनेकांच्या विचारांची नाळ महाराजांशी जुळली. त्याप्रमाणे समाजातील अनेकांची परमार्थाच्या भक्तीची माळ जोडली. अनेकांच्या गळ्यात त्यांनी तुळशी माळ घातली. अनेकांना भक्ती मार्गाला लावले. अनेक जण वारकरी झाले. ‘ प्रत्येक माणसाला सुखदुःखासाठी सांगण्यासाठी जवळच्या काही व्यक्ती असाव्या लागतात’ . समाजातील काही माळकरी, टाळकरी, कीर्तनकार , प्रवचनकार असे काही होते..
याशिवाय विविध क्षेत्रातील अनेक ज्ञात अज्ञात अनेक मान्यवर गायकवाड महाराजांवरती प्रेम करणारे होते. निवृत्ती महाराजांच्या चेहऱ्यावरती निराशा कधी नव्हती. ते सतत हसतमुख होते. *”हसतमुख प्रसन्न व्यक्तीच्या सहवासात येणारा’ कोणताही माणूस चिंतामुक्त आणि तणावमुक्त होतो*”.! तो माणूस कधी दुःख किंवा चिंता व्यक्त करीत नाही. असे म्हणतात, “*जोपर्यंत एखाद्या माणसाच्या संपर्कात माणसे येत नाहीत.’ तोपर्यंत त्याच्या स्वभावाची जाणीव होत नाही”* निवृत्ती गायकवाड महाराजांना ज्यांनी ज्यांनी जवळून पाहिले. त्यांना त्यांच्या स्वभावाची अष्टपैलू गुणांची जाणीव झाली. यासाठी त्या व्यक्तीकडे डोळस वृत्तीने पहावे लागते. ” निस्वार्थीपणाने जवळ आलेली माणसं, कधीही त्यांना सोडून गेली नाहीत. असा अनुभव गायकवाड होता. महाराजांवरती जिवापाड प्रेम करणारे आणि भक्ती सांप्रदायाच्या क्षेत्रात रमान होणारे कै. नामदेव उनवणे सर यापैकी एक होते. कै.नामदेव उनवणे सर यांचे मूळ गाव निमगाव सावा .तालुका ‘जुन्नर. जिल्हा ,पुणे .या घराण्याला शिक्षणाचा आणि परमार्थाचा वारसा लाभला होता. शैक्षणिक क्षेत्रात नोकरीच्या निमित्ताने ते अनेक वर्ष अवसरी खुर्द या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले. त्यांच्या सौभाग्य श्रीमती रंजना उनवणे ह्या प्राथमिक शिक्षिका, मुख्याध्यापिका,नंतर केंद्रप्रमुख असा त्याचा परिवाराचा शैक्षणिक आलेख होता. कै.नामदेव उनवणे सर हे 34 वर्ष शिक्षण क्षेत्रात सेवा करून ते 2015 सेवानिवृत्त झाले . प्रपंच सुखाचा होता. उरलेला कालावधी आपण परमेश्वराच्या सानिध्यात घालवावा. म्हणून ते ह .भ. प .निवृत्ती महाराज गायकवाड यांच्या सहवासात आले. प्रत्येक माणसात कोणते गुण आहेत? हे ओळखण्याची कला महाराजांना अवगत होती. त्याप्रमाणे कै. नामदेव उनवणे सरांच्या स्वभावाची जाण बाबांना आली . सरांनी सुद्धा बाबांवरती जीवापाड प्रेम केले. ईश्वर सेवेत त्यांनी वाहून घेतले .तसे उनवणे सरांना धार्मिक वातावरणाची गोडी होती .दररोज ते नित्यनेमाने पूजा, वाचन हे करत असत. परंतु बाबांच्या सानिध्यात आल्यानंतर काकडा, हरिपाठ यामध्ये ते रमून गेले. आणि बाबांच्या घरी येणे जाणे वाढले. बाबांचे सुद्धा अवसरी येथे उनवणे परिवारात येणे जाणे वाढले. त्यामुळे कै.नामदेव सरांबरोबरच त्यांची पत्नी, त्यांची मुले बाबांच्या विश्वासाचे सेवक बनले. कै. नामदेव उनवणे सर हे बाबांबरोबर दिंडी ,पायी वारी ,हरिनाम सप्ताह, आळंदी धर्मशाळेसाठी वर्गणी, देणगी जमा करणे. ही सर्व कामे करू लागले.ते बाबांच्या विचारांशी एकरुप झाले . दोघे ही एकमेकांच्या परिवारामध्ये सुखदुःखाचे काही क्षण असतील .तर ते आवर्जून ते सल्ला मसलत करत .आणि त्याप्रमाणे ते मार्गक्रमण करीत. “तीर्थक्षेत्र पंढरपूर हे विठ्ठलाचे देवस्थान आहे’. देव हे आपल्या जीवाचा जीवपण आहे”. देवाची मूर्ती पाहिल्यानंतर मन भूलते .देवाच्या मुखाला कस्तुरी गंध आहे .कस्तुरीचा टिळा, विटेवर समाचार ठेवा .तो उभा आहे . पंढरपूरला गेल्यानंतर परब्रम्ह भेटल्याची जाणीव गायकवाड महाराजांनी अनेक वेळा होते.ही भावना अनेक वेळा आपल्या वारकऱ्यांना त्यांनी बोलून दाखवली.तो पंढरीचा महिमा अनेकांना बाबामुळे भावला. परमार्थाची गोडी ही सरांना लागली. भक्ती सेवा करण्याचा अनुभव वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आला.स्मरण ,कीर्तन, श्रवण ,चरण, सेवा पूजा, वंदना ,दास्य आणि आत्मनिर्जन सेवेचा मार्ग त्यांनी स्विकारला. उनवणे सरांच्या सौभाग्यवती रंजनाताई यांच्याशी निवृत्ती महाराज गायकवाड आणि कै.नामदेव उनवणे सर यांच्या भक्तीनात्या विषयी चर्चा केल्यानंतर लक्षात आले.
एक प्रसंग त्यांनी आवर्जून सांगितला. उनवणे बाईंचे थायरॉईडचे ऑपरेशन होते.त्यासाठी त्यांना पुण्यात ऍडमिट करायला लागले .त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा, मुलगी ,जावई आणि स्वतः सर दवाखान्यात उपस्थित होते. थोड्याच वेळात सौ रंजना उनवणे यांना ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन जाणार होते. यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते .की, ऑपरेशनमध्ये काही धोका निर्माण होऊ शकतो? काळजी घेतली गेली पाहिजे. हे घरच्यांना सर्वांना सांगितले होते . सरांना हे सर्व माहित होते . परन्तु तेवढ्यात निवृत्ती बाबांचा आळंदीवरून फोन आला. ‘हरिनाम सप्ताह फक्त सुरू करायचा आहे. तुम्ही ताबडतोब या.’! असे ऐकल्यावर सरांनी सौभाग्यवती रंजना उनवणे यांना ऑपरेशन थेटरमध्ये सोडून हे आळंदीच्या धर्म धर्मशाळेकडे जावयाच्या मदतीने आळंदीला आले. त्यावेळी जावयांनी सरांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु गायकवाड महाराजांवरती असणारी श्रद्धा आणि प्रेमामुळे त्यांनी दिलेल्या निरोप महत्त्वाचा आहे.त्यांनी सांगितलेले काम हे अधिष्ठान मानून ते पहिले केले पाहिजे. स्वतःच्या बायकोच्या तब्येतीची पर्वा न करता चालते झाले .दवाखान्यातून जाताना ते म्हणाले, “तू काही काळजी करू नकोस, माऊली सर्व करून घेईल”माऊली तुझी काळजी घेईल.उनवणे सर आळंदीला आले .सप्ताह सुरू केला. आणि त्यानंतर पुन्हा ते ऑपरेशनथेटर मध्ये पत्नीला पहाण्यासाठी आले. तोपर्यंत पत्नीचे ऑपरेशन सुखरूप झाले होते.
या सर्व प्रसंगावरून आपल्या लक्षात येत .की, बाबांवरती उनवणे सरांचा विश्वास किती मोठा होता? उनवणे सर स्वतःच्या परिवारात चर्चा करीत असताना.नेहमी सांगत की, ह .भ .प. निवृत्ती महाराज गायकवाड यांचा जन्म इतर समाजात झाला असता. तर त्या समाजाने त्यांना डोक्यावरती घेऊन नाचले असते. त्यांचा नावलौकिक केला असता. त्यांच्या विचारांची पारायणे केले असती.परंतु दुर्दैव आहे .आपल्या समाजाला त्यांचे मोठेपण समजत नाही. “*निवृत्ती महाराजांसारखा समाजात देव माणूस होणे नाही”* समाजाचा पैसा कधीच ते स्वतःच्या प्रपंचाला खर्च करीत नाहीत. या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार म्हणजे मी आहे .
उनवणे परिवारात गायकवाड महाराजांचे सततचे येणे जाणे असल्याने. त्यांच्याशी ते एकरूप झाले. त्यामुळे आज उनवणे परिवारची प्रगती ही ह .भ .प .निवृत्ती महाराज गायकवाड यांची पुण्याई म्हणावी लागेल. उनवणे परिवाराचा हा सुवर्णकाळ ठरला .कै.नामदेव उनवणे सरांचे अल्पशा आजाराने दुर्दैवी निधन झाले असले .ते आज हयात नाहीत. तरी त्यांच्या पश्चात असणारी त्यांची पत्नी रंजनाताई उनवणे या केंद्रप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्यात. त्यांची तीनही मुले उच्च शिक्षित आहेत. मुलगा इंजिनियर आहे .तो संगीत क्षेत्रात नावलौकिकात आहे . बेसगिटारईस्ट आहे .तर मुलगी शिक्षिका आहे. एक मुलगी मेकॅनिकल इंजिनिअर आहे . हे सर्व बाबांच्या सहवासाने आणि मार्गदर्शनाने झाले. बाबांची सर्व मुले शिक्षण क्षेत्रात पारंगत होती त्यांचा ते अनुभव घरी आल्यानंतर नेहमी सांगत होते. त्याचा परिणाम मुलांवरती झाला.त्यामुळेच उनवणे परिवाराचा सुवर्णकाळ ठरला.
अध्यात्माची फलप्राप्ती म्हणजे काही दिवसापूर्वी उनवणे सरांच्या मुलाने पंढरपूर येथील मंदिरात जाऊन एक दिवस संगीताचा कार्यक्रम सादर केला .त्यामुळे त्या ठिकाणी त्याला पांडुरंगाचे व्हीआयपी दर्शन मिळाले. व विठ्ठल मंदिर समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते त्याचा सत्कार झाला. यावेळी या मुलाच्या डोळ्यात पाणी आले. अश्रू आनंदाचे आणि दुःखाचे होते. हा आशीर्वादाचा क्षण बघण्यासाठी ज्याप्रमाणे वडील कै. नामदेव उनवणे पाहिजे होते .तसे वैकुंठवासी ह .भ .प. निवृत्ती महाराज गायकवाड हे या कार्यक्रमाला पाहिजे होते. अशी नकळत भावना या मुलाच्या मनामध्ये येऊन गेली. “*तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे हा सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाने ह.भ.प निवृत्ती महाराज गायकवाड यांच्या कृपाशीर्वादाने मिळालेला प्रसाद होता.*”.