प्रतिनिधी : सचिन थोरवे
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजाभवानी मातेचा पलंग जुन्नर या ठिकाणावरून पहिल्या दिवशी वाजत गाजत आणि भाविकांनी पाय घड्या घालत आणि ओवाळून पूजन करत पलंग देवतेचे स्वागत केले पहिल्या दिवशी पलंग कुमशेत का गावामध्ये मुक्कामी असून येथील यात्रा देखील आनंदात साजरी होत असते दुसऱ्या दिवशी हापूस बाग या ठिकाणी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पलंग देवता हनुमान मंदिरामध्ये मुक्कामी असून शिरोली बुद्रुक आगर विठ्ठलवाडी येथील हजारो भाविक हापूस बाग या ठिकाणी पलंग देवतेच्या दर्शनासाठी येत असतात.
यात्रेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या सर्व भावी भक्तांना दरवर्षी अन्नप्रसाद दिला जातो प्रत्येक वर्षी शक्यतो या ठिकाणी यात्रेदरम्यान दिवसातून एकदा तरी पाऊस येतोच परंतु यावर्षी वरून राजा विसवल्याचे चित्र पाहण्यास मिळाले यात्रेसाठी आलेल्या मान्यवरांचा गावातील यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.