.
गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ
ता.२० कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन व जहांगीर हॉस्पिटल पुणे याच्या वतीने तसेच ग्रामपंचात तरडोबाचीवाडी सहकार्याने बाल मित्र ग्राम येथे आरोग्य तपासणी शिबीर आज संपन्न झाले. या शिबिरासाठी गावातील मार्जनालाईज समुदाय,गावातील महिला,पुरुष,जेष्ठ नागरिक,बालक, शाळेतील मुले इत्यादी सहभागी झाले होते.या शिबिरास 300 हून अधिक रूग्णांनी लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार,तरडोबाचीवाडी सरपंच जगदिश पाचर्णे.उपसरपंच अमोल देवकाते. ग्रामसेवक नंदकुमार वैद्य.ग्रामपंचायत सदस्य.व ग्रामस्थ उपस्तिथ होते.
पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल यांच्या वतीने या शिबिरासाठी ENT, Genral, फिजिशियन,Dermatologist,स्त्री रोग तज्ञ,मेडिकल कौन्सलर,मेडिसिन, या सर्व सोई सुविधा या वेळी उपलब्ध करण्यात आले होते. कैलास संस्थेच्या वतीने मुख्य ऑफिसचे आलेन तसेच BMG शिरूर टीम यावेळी उपस्थित होते.कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन या संस्थेचे शिरूर तालुक्यातील 40 गावात अतिशय नावीन्य पूर्ण उपक्रम गेल्या वर्षभरापासून राबवत आहे. तरडोबाचीवाडी येथील आरोग्य तपासणी शिबिर व्यवस्थित झाले. पुढील काळात संस्थेच्या वतीने या पेक्षा ही चांगले व नावीन्य पूर्ण उपक्रम घेण्यात येणार आहे असे प्रतिपादन या वेळी संस्थेचे जिल्हा समन्वयक सुभाष गटखणे यांनी केले.