*भाग 4 था*काशिनाथ आल्हाट*

*साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार्थी*8830857875

शिरूर प्रतिनिधी – शकील मनियार

ह .भ प .निवृत्ती महाराज गायकवाड यांनी वारीची, दिंडीची परंपरा चालू ठेवली.त्यातून समाजाला अध्यात्माची गोडी निर्माण केली . ‘”गायकवाड महाराजांनी खऱ्या अर्थाने भक्तीच्या मार्गातून शौर्य निर्माण केले.” हे शौर्य निर्माण करताना, त्यांनी दिंडीतील, वारीतील जनमानसाच्या हातात हात धरून ते निर्माण केले .तो हात कधी मायेचा राहिला. तर कधी आधाराच राहिला. आपणास माहित आहे. की, “मुलं लहान असतात . तेव्हा बाप मुलाचा हात धरतो. हात धरून प्रवास करतो. त्या मुलांना चालायला शिकवतो.’ त्यामध्ये मुला बद्दलचं प्रेम, वात्सल्य आणि जिव्हाळा असतो .पण ,’तोच बाप म्हातारा झाला. की, मुलं बापाचा हातात हात धरून त्यांची देखभाल करतात.”त्यावेळी ते त्यास आधार देतात .

‘खरं तर !हातात हात धरण्याची प्रक्रिया एकच असते’. परंतु लहानपणी मुलाला दिलेला हात त्यात जिव्हाळा ,स्नेह, जपलेला असतो .तर म्हातारपणी दिलेला हात हा आधाराचा असतो’. गायकवाड महाराजांनी दिंडीच्या रूपाने वारीत आलेल्यांना अनेकांना पायी प्रवासात हातात हात दिला. मायेचा हा तिला. त्यामुळे वारीत आणि दिंडीत सहभागी वारकऱ्यांची संख्या वाढली .गायकवाड महाराजांनी दिंडीच्या, वारीच्या रूपाने व्यक्ती बदलाची प्रक्रिया सुरू केली हे प्रामुख्याने जाणवते. परमेश्वराची शक्ती ही गायकवाड महाराजांच्या पाठीशी होती म्हटले तर वावगे होणार नाही.आपणास प्रमाण माहित आहे .”जेथे जातो तेथे ‘तू माझा सांगाती! परमेश्वराची सतत संगत असल्याने गायकवाड महाराजांना कोणत्याच कार्यात अपयश कधी आले नाही . हा अनेकांचा अनुभव आहे . ते अध्यात्मातून परमेश्वराचा प्रवास सतत करीत राहिले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करताना असे लक्षात येते. की, प्रवचन, कीर्तन ,हरीनाम सप्ताह सतत करीत असताना ते कुटुंबापासून आणि परिवारापासून काही दिवस दूर राहायचे. कुटुंबामध्ये सणावाराला किंवा आनंदाच्या क्षणी सुद्धा देखील घरी नसत. अशावेळी त्यांच्याकडून कुटुंबाला काही मदत , कधी सहकार्य एकत्रितचा आनंद कधी घेता आला नसेल. बाबा घरी पाहिजे होते. असे कोणीतरी म्हटले असेल.हे कधी ना कधी घडले असावे. .त्यावेळी सामान्य माणसासारखी त्यांचीही डोकेदुखी होत असावी. कुटुंबाची होत असेल. परंतु त्यांची परमेश्वराची भक्ती अतूट असल्याने गायकवाड महाराज हे परमेश्वराच्या भक्तीत एकरूप असल्याने त्यांच्या कुटुंबाला आधार, संरक्षण देण्याचे काम आणि मन परिवर्तन करण्याचे काम परमेश्वर निश्चित पद्धतीने करीत असावेत. शक्ती आणि भक्तीची अनेक उदाहरणे आपल्या वाचनात आहेत.याचे उदाहरण द्यायचे जर झाले. तर संत जनाबाईंना देव दळण दळू लागले. तर सजन कसाईला काम करू लागले. तसेच कार्य या परिवाराला नकळत परमेश्वरांकडून घडले असेल.

गायकवाड महाराज परिवाराला अथवा समाजाला अनेक वेळा महाराज भेटत नाहीत.घरी थांबत नाहीत. अशा गोष्टींवरून महाराजांशी वादविवाद झाला असेल. त्यांच्या कामात अडथळा आणण्यासाठी विरोधाभास केला असेल. परंतु त्या विरोध भक्तीने पुन्हा तितक्याच ताकदीने महाराज परमेश्वराच्या कार्यासाठी तयार होत.ते त्यांनी ध्येय सोडले नाही. विरोधाचे प्रमाण जेवढे वाढत राहिले. तेवढेच त्यांचे कार्य त्या पटीत वाढत गेले. हे त्यांच्या कर्तृत्वातून आपणास दिसून येते. गायकवाड महाराज यांनी एक आदर्श कुटुंबासाठी पाया घातला. एक आदर्श कुटुंब तयार केले. तर त्यांच्या पुढील पिढीने आदर्श समाज निर्माण करण्यासाठी कळस चढविला. त्यांच्या मुलांनी शिक्षण, प्रवचन कीर्तन, वैद्यकीय सेवा प्रवाहतून त्यावर कळस चढविला . असे म्हणावे लागेल .या मार्गातून अनेक अज्ञानी सज्ञान करण्याचे काम याद्वारे घडविले. गायकवाड महाराजांनी “ज्यांना ज्यांना माथा आहे. त्यांच्या माथी गाथा लावला.” आणि सन्मार्गाचा मार्ग दाखविला. परमार्थाच्या माध्यमातून प्रबोधन केले.ते खरे समाजशिक्षक होते. ‘खरं तर! ज्ञान वाटण्याचे जीवनभर कार्य त्यांनी केले.त्यांनी स्वतःसाठी काही शिल्लक ठेवले नाही. किंवा त्याचा विचार केला नाही. याचे आपणास प्रमाण द्यायचे झाले.” संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी गाडीभर ऊस आणला होता. परंतु त्या गाडीतील ऊस अनेकांनी ओढून घेवून गेले.अनेकांना त्यांनी दिला.

संत तुकाराम महाराज ऊसाची गाडी घरी घेऊन गेले . तेंव्हा फक्त एक ऊसाचे एक कांडे राहिले होते . एकच ऊस राहिला होता.पण ज्यांनी ज्यांनी ऊस घेतला .त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद संत तुकाराम महाराजांनी परमोच्च आनंद पाहिला.तो आनंद त्यांनी वाटला. कारण आनंद वाटण्यात आनंद आहे .तो कशातच नाही . संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे मत होते . या विचारांचे अनुकरण गायकवाड महाराज यांनी जीवनभर अध्यात्माच्या माध्यमातून समाजाला आणि कुटुंबाला अनमोल आनंद वाटला .

(क्रमशः भाग 5 पुढील अंकात)

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button