प्रतिनिधी : सचिन थोरवे
जुन्नर उपकार्यकारी अभियंता म्हणून राजेश दाभाडे यांची नियुक्ती झाली असून पहिल्याच दिवशी त्यांच्या पाच ऑफिसला भेट देऊन तेथील सर्व कामाची माहिती त्यांनी घेतली आहे शिरोली बुद्रुक येथील वीज ऑफिसला त्यांनी प्रथमच भेट दिली असता त्यांचा तालुका शेतकरी संघटनेचे वतीने सत्कार करण्यात आला. येथील सर्व वीज कर्मचारी यांना कामाविषयी योग्य त्या सूचना दिल्या असून कामावर असताना वीज कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेला ड्रेस कोड महत्त्वाचा असल्याचे सांगितले त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपण प्रथमता ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा मानस असल्याचे देखील सांगितले.
नादुरुस्त रोहित्र आणि फ्यूज बॉक्स यांची माहिती घेण्याची सूचना शिरोली ऑफिसच्या मोरे यांना दिली शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्यासाठी सोलर साठी जागा कमी पडत असल्यास त्यासाठी देखील प्रयत्न करणार असून शक्यतो सोलर वापरल्यास त्यातून कोळसा आणि पाण्याची देखील बचत होणार आहे आणि वीज चोरी देखील थांबेल सोलर पंप जास्तीत जास्त बसवण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी देखील सोलर सिस्टीमचा वापर करावा यासाठी मेळावे घेऊन ग्राहकांमध्ये जनजागृती करणार अभय योजनेचा लाभ 30 नोव्हेंबर घेतल्यास थकबाकीदार ग्राहकांना थकबाकीवरील व्याज विलंब आकार माफ करणार असल्याची माहिती दाभाडे यांनी दिली आहे.