कवठे येमाई प्रतिनिधी : मारूती पळसकर 1

शिरूर तालुक्यातील कवठे यमाई गावात असणारे शेतकरी कैलास पळसकर यांच्या कुटूंबात जन्मलेल्या साक्षीने लहान पणापासून शासकीय नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगले असताना अनेक समस्यांवर मात करून तिने ते सत्यात उतरवले.नुकतीच ठाणे शहर पोलीस निवड चाचणीत साक्षीने शारिरीक चाचणीत ४१ गुण तर लेखी परिक्षेत ९० गुण मिळवत पोलीस पदाला गवसणी घातली आहे.

कवठे येमाई येथील स्थायिक शेतकरी कुटूंबातील साक्षी कैलास पळसकर हिचे चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.तर माध्यमिक शिक्षण गावातील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पुर्ण केले.पुढील शिक्षणाची फारशी सुविधा नसताना तिने उच्चमाध्यमिक शिक्षण मुखईच्या अश्रमशाळेत तर निघोज (ता.पारनेर ) येथील मुलिकादेवी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत शासकिय नोकरी करण्याचे ध्येय निश्चित केले होते.वडिलांचेही चांगले शिक्षण झालेले मात्र वेळोवेळी प्रयत्न करूनही त्यांना पोलीस होता आले नाही तेच स्वप्न जणू साक्षीने पोलीस होऊन पूर्ण केले.मुलीच्या जिद्दीचे समाजाने, गावाने तोंड भरून कौतुक केले.

मिळालेल्या यशाने साक्षीचाही आनंद गगनात मावेनासा झाला तर उत्तरोत्तर अशीच यशाची शिखरे सर करणार असल्याचे साक्षीने सांगितले.गरीब शेतकरी कुटूंबातील अशा या जिद्दी साक्षीची कहाणी इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

  1. ↩︎
Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button