प्रतिनिधी : सचिन थोरवे

श्री क्षेत्र ओझर येथे माघ शुद्ध चतुर्थीनिमित्त गणेश जयंती सोहळ्यास हजारो भाविकांच्या उपस्थितीत फुलांचा वर्षाव करून भक्तीमय वातावरणात मोरया गोसावींची पदे म्हणत श्री विघ्नहाराचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.सकाळी ४.३० वाजता मंदिर उघडण्यात येऊन श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे,उपाध्यक्ष तुषार कवडे,विश्वस्त विनायक मांडे,सौ.शिल्पा जगदाळे व ग्रामस्थ यांनी अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. ठीक ७.०० वा. महाआरती संपन्न झाली.जन्मोत्सव सोहळ्याच्या शुभ दिनी महाआरतीचा मान गणेशभक्त तुषार येवले,निखील जाधव,मोहित ढमाले,अनिकेत खालकर,वैभव मांडे यांना मिळाला. तिथी भाद्रपद शु ४ चतुर्थी वार शनीवार दिनांक ०७/०९/२०२४ सकाळी ९ ते १२.०० वा. चौथा उत्तरद्वार अंबेराई ओझर (जगदाळे मळा) पृथ्वी- सूर्य पूजा करून संपन्न झाला. या पालखी सोहळ्यात श्री क्षेत्र ओझर येथील श्रीराम प्रसादिक भजनी मंडळ व श्री विठ्ठल प्रसार्दिक भजन मंडळ सहभागी झाले होते. द्वार यात्रेत सुमारे दहा हजार भाविक सहभागी झाले होते. रस्त्यावर दोन्ही बाजूने रांगोळी काढून श्री विघ्नहराच्या पालखीचे स्वागत फुलाची उधळन करुन स्थानिक ग्रामस्थ यांनी केले. या मध्ये स्थानिक ग्रमास्थ यांनी द्वार यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना अल्पोपहार, पाणी व्यवस्था पालखी मार्गात उपलब्ध केली होती. ठीक १०.३०. वा. श्री विघ्नहराच्या पालखीचे प्रस्थान अंबेराई मंदिरात झाले. मंदिरामध्ये गेल्यानंतर धार्मिक विधी संपन्न होऊन तेथील ग्रामदेवता ट्रस्ट यांनी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे,सचिव सुनिल घेगडे,खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त मंडळाचा सत्कार करण्यात आला. ठाक ११.०० वा. पालखी श्री क्षेत्र ओझर च्या दिशेने पालखीचे प्रस्थान झाले ठीक .११.४५ मानटांनी पालखीचे मंदिरात आगमन झाले.

श्री विघ्नहर आपल्या बहिणींना आमंत्रण देऊन आल्यावर आज देवजन्मापूर्वी वाजत गाजत चारही मंदिराच्या वतीने आलेला आहेर श्री विघ्नहर मंदिरात घेऊन जाण्यात आला. मंदिरात मोरया गोसावीच्या पदांचे गायक होऊन कीर्तनकार ह.भ.प माउली महाराज कुसूरकर ,कुसूर ओझर यांचे देवजन्माचे कीर्तन संपन्न झाले. विघ्नहर्त्या गणरायाचे मंदिर गाभारा,आवार आणि मंदिरा बाहेरील परिसरातील गणेश भक्तांच्या प्रचंड गर्दीने व श्रींच्या नामघोषामूळे परिसरातील वातावरण मंगलमय झाले होते. ग्रामस्थ,देवस्थानचे पुजारी हेरंब जोशी,विघ्नराजेंद्र जोशी,जयेश जोशी, अमय मुंगळे यांनी मोरया गोसावी पदांचे गायन केले. देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे,सचिव सुनिल घेगडे,खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त प्रकाश मांडे,सुर्यकांत रवळे,गोविंद कवडे,विक्रम कवडे,समीर मांडे,विनायक मांडे,संतोष कवडे,विलास कवडे,मंगेश पोखरकर,विनायक जाधव, सौ शिल्पा जगदाळे यांनी सोहळ्याचे उत्तम नियोजन केले होते. गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरयाच्या नोमघोषात दुपारी १२.३० वाजता श्रींचा जन्मोत्सव सोहळा पार पडला.त्या नंतर आरती घेण्यात आली या आरतीचा मान आखाड्याचे लिलावदार श्री हनुमंत कवडे, सुनील कवडे, पागोट्याचे लिलावदार श्री कचरू कवडे, केशव कवडे, जगन्नाथ घेगडे व पानसुपारीचे लिलावदार २००७ दहावी (एस.एस.सी) ब्याच अनिकेत रवळे,आशिष कवडे,प्रसाद मांडे,मिलिंद टेंभेकर, अनिकेत बोडके,अभिषेक मांडे,गणेश गोफणे,राजेंद्र रवळे,आकाश मांडे,अमोल ढवळे,संतोष जाधव,राजेश घेगडे,मिनिनाथ टेकुडे,अविशान टेंभेकर यांना देण्यात आला.

हजारो भाविकांनी रांगेत श्रींचे दर्शन घेतले. या जन्मोत्सव सोहळ्या निम्मित महाआरती मध्ये सहभागी झालेले गणेशभक्त व भाविक यांनी देवस्थान ट्रस्ट च्या विकास कामांसाठी देणगी दिली. या उत्सवात जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुल बेनके,विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर,जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे,यांची उपस्थिती होती. गर्दीचे नियोजन ओतूर पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी लहू थाटे व सहकारी तसेच देवस्थानचे व्यवस्थापक ,कर्मचारी यांनी केले.मंगलमय वातावरनामध्ये जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button