शिरूर प्रतिनिधी: शकील मनियार
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीची सहविचार सभा रविवार दिनांक 1.9.2024 रोजी रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न झाली.*या सहविचार *सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक परिषद पुणे विभागाचे उपाध्यक्ष गुलाबराव डाळिंबकर तर प्रमुख उपस्थिती मध्ये पुणे विभागाचे संघटन मंत्री रामदास अभंग हे उपस्थित* होते.
या सहविचार सभेमध्ये शिक्षक परिषद *शिरूर तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आल्याचे पुणे जिल्हा शिक्षक परिषदेचे कार्यवाह महेश शेलार यांनी सांगितले.* *नूतन शिरूर तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे*प्रविण आढाव – अध्यक्ष रविंद्र सातपुते – कार्यवाह सुधीर थोरात- उपाध्यक्ष मच्छिंद्र खेडकर- उपाध्यक्ष विकास घुले- कार्याध्यक्ष सचिन रासकर -कोषाध्यक्ष रमेश घावटे – सहकार्यवाह जयवंत कोकरे- सहकार्यवाह माधुरी डाळिंबकर – महिला आघाडी प्रमुख रुपाल नरूटे – महिला सदस्य अनिता चव्हाण – महिला सदस्य अनिल गोल्हार- संघटन मंत्री राहुल तावरे – कार्यालय मंत्री रविंद्र उघडे- कार्यकारी सदस्य दत्ता लांडगे-कार्यकारी सदस्य *नूतन कार्यकारिणीचे शिक्षक परिषद पुणे जिल्हाध्यक्ष निलेश काशीद सर यांनी अभिनंदन केले.
तसेच या सहविचार सभेमध्ये शिक्षक परिषदेची आगामी भूमिका,आंदोलने,शिक्षण विभाग सहविचार सभा,सदस्य नोंदणी,जिल्हा गुणवंत पुरस्कार या बाबत सखोल चर्चा झाल्याचे ही त्यांनी सांगितले.यावेळी जुन्नर तालुकाध्यक्ष कैलास करपे,पुरंदर तालुकाध्यक्ष शिवहार लहाने, कार्यवाह दीपक भोसले, सहकार्यवाह दत्तात्रय बनकर, ज्ञानेश्वर सस्ते, पुणे ग्रामीणचे नूतन सदस्य अशोक दहिफळे, मोहन ओमासे, संपत सांडभोर,गोपीनाथ जाधव,भरत मोटे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.