शिरूर तालुका प्रतिनिधी : शकील मनियार
ग्रामपंचायत वारूळवाडी व राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने *लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे* यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील बहुसंख्येने मान्यवर उपस्थित होते. *मा..प्राचार्य पांडुरंग गायकवाड ,मा शिवाजी राजगुरू (उपाध्यक्ष,आद्यगुरू लहुजी वस्ताद साळवे शासकीय स्मारक समिती),मा.राजेंद्रभाऊ मेहेर (सरपंच,वारूळवाडी ग्रामपंचायत), मा.दिपकभाऊ बाळसराफ (सरपंच,सावरगांव ग्रामपंचायत), मा..दातखिळे साहेब (सरपंच,दातखिळेवाडी ग्रामपंचायत), मा..भावेश डोंगरे (सरपंच,आर्वी ग्रामपंचायत),मा.जुबेर शेख (अध्यक्ष, राजे पतसंस्था),मा..संतोष डोके (तालुकाध्यक्ष,शिवसेना आंबेगाव तालुका), मा.मिनाक्षीताई खरात (उपाध्यक्ष,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी फाऊंडेशन), प्रसिद्ध बैलगाडामालक मा..एकनाथ कसबे, मा.बाबाजी कोरडे (तमाशा अभ्यासक), मा..दादाभाऊ आल्हाट (सेवानिवृत्त मुख्याध्यापक),मा वसंतराव लोंढे (सेवानिवृत्त वनाधिकारी),. मा.काशिनाथ आल्हाट (संस्थापक/अध्यक्ष,हलगीसम्राट केरबा पाटील फाऊंडेशन)* आदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाच्या निमित्ताने *शाहीर ठकसेन शिंदे* यांच्या शाहिरी गाण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. *प्रसिद्ध गायिका व लावणीसम्राज्ञी सौ.सीमा पोटे, प्रसिद्ध गायिका व तमाशासम्राज्ञी रेणुका खुडे, प्रसिद्ध गायिका सौ.गायत्री शेलार, प्रसिद्ध गायिका सौ.अनुराधा खंडे, प्रसिद्ध गायिका सौ.शारदा गावडे, प्रसिद्ध गायिका व तमाशासम्राज्ञी सौ.नंदा भोकटे, प्रसिद्ध गायिका व लावणीसम्राज्ञी मिराबाई दळवी* आदी कलाकारांनी अण्णाभाऊं साठे यांच्या जीवनावर गाणी सादर केली.
तमाशा फड मालक किरणकुमार ढवळपुरीकर , विनोदसम्राट सुधाकर पोटे, फॉरेन रिटर्न गायक संजय फल्ले, तमाशासम्राट कैलास नारायणगावकर, तमाशासम्राट महादेव खुडे , तमाशासम्राट राजेश नारायणगावकर, प्रसिद्ध ढोलकीसम्राट शैलेश भंडारे,तमाशा फड मालक संजय महाडिक, प्रसिद्ध वादक निलेश भंडारे, प्रसिद्ध वादक भालचंद्र पोटे आदी गुणवंत कलावंत उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध ढोलकीसम्राट पमाजी पंचरास लोणीकर व वाजंत्री ताफा, प्रसिद्ध सनईसम्राट दादाभाऊ आल्हाट घोडेगावकर व वाजंत्री ताफा* या वादन संचांनी पारंपारिक वादन करून आण्णाभाऊंना अभिवादन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे *मा.प्राचार्य डॉ पांडुरंग गायकवाड* म्हणाले, “संघर्षा शिवाय माणूस मोठा होत नाही”. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले सर्व महामानव महामानव छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिराव फुले, लहुजी वस्ताद साळवे ,अण्णाभाऊ साठे ,राजश्री शाहू महाराज, सावित्रीबाई फुले. या महामानवांचे विचार आपण अंगीकृत केले पाहिजेत. आपण परिस्थितीचा आभास निर्माण करून आपण आपला विकास थांबवतो .साहित्य अण्णाभाऊ साठे यांनी परिस्थितीवरती मात केली. म्हणूनच त्यांची जयंती आपण साजरी करत आहोत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने *मा..नवनाथशेठ भागवत(नवउद्योजक पुरस्कार),मा..अमोल अंकुश(सामाजिक योगदान पुरस्कार),मा..नरेश पंचरास(सनई सम्राट पुरस्कार),मा..शाहीर ठकसेन शिंदे(शाहिरी पुरस्कार),मा.दादाभाऊ आल्हाट(सनई सम्राट पुरस्कार),.सौ.गायत्री शेलार(गुणवंत गायिका पुरस्कार),धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्था (आदर्श नागरी पतसंस्था पुरस्कार),मा..नंदकुमार नेटके(उत्कृष्ट गायक पुरस्कार),मा.रामदास भोईर(उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार),मा.राजेंद्रभाऊ मेहेर(आदर्श सरपंच पुरस्कार),मा.सौ.अनिता शिंदे(आदर्श शिक्षणाधिकारी),मा..कैलास सावंत नारायणगावकर(गुणवंत तमाशा कलावंत पुरस्कार),मा.जनार्दन वायदंडे(ढोलकीसम्राट पुरस्कार),मा.शकिलभाई मणियार(आदर्श पत्रकारिता पुरस्कार),मा.भगवान काशिद(आदर्श शिक्षक पुरस्कार),मा..शांताराम डोंगरे(आदर्श शिक्षक पुरस्कार),मा.सौ.पुनम हांडे(आदर्श शिक्षक पुरस्कार),मा.विष्णू धोंडगे(आदर्श अधिकारी पुरस्कार),मा.आशिष दुर्गे(सामाजिक योगदान पुरस्कार)* प्रशांत भूजबळ लिपिक पुरस्कार आदी मान्यवरांना *अण्णाभाऊ साठे पुरस्कार* देवून सन्मानित करण्यात आले.
उपस्थित महिलांना भेट म्हणून *बहिण लाडाची, साडी सन्मानाची* वितरण करण्यात आली. चविष्ट भोजन सभारंभाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या निमित्ताने शाहीर लक्ष्मण लोखंडे , हलगीसम्राट एकनाथ आल्हाट,.सुनील आल्हाट, महादेव खुडे, मनोहर वायकर सर.मेहबूब काझी सर, संदिप थोरात सर,अनिल शिंदे,अनिल खुडे,विशाल शेलार,सचिन लोखंडे,राजकुमार भालेराव सर,संतोष पंचरास आदी समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक साईनाथ कनिंगध्वज सर व आभार सचिव अमित आल्हाट यांनी केले.