जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत शेतीमध्ये काम करणाऱ्या वयोवृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळी गजाड करून दोन गुन्हे उघडकीस आणले असून त्यातील दोन लाख 51 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी केले आहे.
सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नारायणगाव पोलीस स्टेशन यांनी 121 किलोमीटर पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास पथकाने आरोपी सुरज उर्फ मोन्या संजय रेडगे वय 24 वर्षे राहणार बजरंगवाडी शिक्रापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे, प्रथमेश उर्फ संतोष सासवडे व 19 वर्षे राहणार बजरंग वाडी शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे, त्याचप्रमाणे अनिकेत रमेश सरोदे व वीस वर्षे तालुका शिरूर जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली सोन्याचे दागिने इसमनामे अमोल एकनाथ पेटारे व 29 वर्ष राहणार बजरंगवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे याला दिल्याचे सांगितले आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेली असून गुन्ह्यात चोरी दिलेला मला हस्तगत करण्यात आला आहे तसेच त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता महिन्यामध्ये शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे कुरळगाव येथे याच प्रकाराचा गुन्हा केले असल्याचे कबूल केले आहे सदर बाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर६५७/२०२४ कलम३०९(६),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचा गुन्हा इसमाने अभिषेक सुभाष विटेकर रा बुरुंजवाडी शिक्रापूर तालुका शिक्रापूर जिल्हा पुणे यांना घेऊन केला होता ह्या पआरोपीला अटक करून गुन्ह्यातील मंगळसूत्र कर्णफुले हस्तगत करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे पुणे विभाग उपविभाग पोलीस अधिकारी रवींद्र चौधर जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पोलीस अंमलदार तुषार बंधारे, दीपक साबळे ,जनार्दन शेळके, संजू जाधव, संदीप वारे ,अक्षय नवले ,अतुल ढेरे ,राजू मोमीन सागर धुमाळ निलेश सुपेकर नारायणगाव पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस अंमलदार कोकणे डोके यांनी केली केली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहे .