गोलेगाव दि. २६ (चेतन पडवळ )
शिरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत शहरासह ग्रामीण भागांमध्ये महीला- मुली, युवक बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक वाढले असून दोन ते तीन महीन्यात तब्बल दहा जण बेपत्ता झाले आहे. त्यामुळे शिरूर पोलीसांपुढे बेपत्ता झालेल्यांचा तपास करणे मोठे आव्हान बनले आहे. याबाबत सविस्तर हकीगत अशी की,दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वा सुमारास अशोक नवले रा. गोलेगाव, ता. शिरूर यांचे आई वडील शेतात गेले होते व घरी त्यांची पत्नी सुरेखा होती. तेव्हा ते तिला म्हणाले की माझे शिरूर येथे बँकेत काम आहे असे सांगुन शिरूर येथे बँकेत गेले .व सायंकाळी ६.३० वा सुमारास काम उरकल्यानंतर घरी आले तेव्हा त्यांना घरी त्यांचे आई वडील दिसले.त्यांना सुरेखा कुठे गेली असे विचारले असता त्यांनी सांगितले की आम्ही सायंकाळी ५.०० वा शेतातुन घरी आलो तेव्हापासुन आम्हाला ती घरी दिसुन आली नाही असे सांगितले. त्यानंतर अशोक नवले यांनी पत्नी सुरेखा हिचा आजुबाजुला शोध घेतला परंतु ती मिळुन आली नाही .पत्नी सुरेखा नवले हि मिसींग झाल्याबाबत अशोक नवले यांनी शिरूर पोलीस स्टेशनला याबाबत खबर दिली आहे. मिसिंग व्यक्तीचे नाव व वर्णन : सुरेखा अशोक नवले ( वय ४४ वर्षे )रा. गोलेगाव ता. शिरूर नेसणीस गुलाबी रंगाची साडी, ब्लाउज गुलाबी, रंग सावळा केस काळे, लांब उंची ५ फुट, गळयात मंगळसुत्र, नाकात मोरणी, पायात पट्टया, पायात चप्पल, डाव्या खुब्याला जुने ऑपरेशनची खुन तर दुसऱ्या घटनेत दि.२३ ऑगस्ट रोजी सकाळी ०८.०० वा सुमारास संभाजी भोर यांच्या घरातील सर्वजण घरी असताना घरासमोर मुगाच्या शेंगा वाळविण्यासाठी टाकलेल्या असताना त्याखाली पाणी गेल्याने संभाजी भोर हे त्यांचे लहान भाउ राजेश याला ओरडलो होते. त्यानंतर त्यांचा भाउ सकाळी ०९.०० वा सुमारास त्यांचा टैम्पो नं एम. एच १२ um०४०३ हा घेवुन गावात गेला. सायंकाळी ७. ०० वा सु भाउ राजेश हा टैम्पो घेवुन अजुन पर्यत घरी आला नाही. म्हणुन त्याच्या मोबाईल फोनवर फोन केला परंतु त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर त्यास वारंवर फोन केले असता त्याने कोणाचाच फोन उचलला नाही. म्हणुन त्याचा सविंदणे गावात आजुबाजुला शोध घेतला परंतु तो आज रोजी पर्यत मिळून आला नाही म्हणुन संभाजी भोर यांनी त्यांच्या भाऊ राजेश शिवाजी भोर हा मिसींग झालेबाबत शिरूर पोलीस स्टेशनला खबर दिली आहे.मिसिंग व्यक्तीचे नाव व वर्णन : नाव- राजेश शिवाजी भोर (वय ३८ वर्षे )रा. संविदणे ता .शिरूर , नेसणीस निळया रंगाचा फुल बाहीचा शर्ट, पॅन्ट चॉकलेटी रंगाची, बांधा मजबुत, रंगाने गोरा, उंची साडे पाच फुट, पायात चप्पल, सोबत विवो कंपनीचा मोबाईल नं ९७६७७३९५१२,७६२०६६९२०६ तसेच सोबत महिंद्रा कंपनीची सुप्रो टॅम्पो नं एम. एच १२यु.एम०४०३ नेला आहे. या घटनेचा पुढील तपास करत आहे.