प्रतिनिधी : मारूती पळसकर
देशाच्या सिमेवर रक्षण करणाऱ्या सैनिक भावांना शिरूर तालुक्यातील ग्रामीण शिक्षण मंडळाच्या बापूसाहेब गावडे माध्यमिक विद्यालय चांडोहतील विद्यार्थीनींनी एक राखी सैनिकांसाठी उपक्रमा अंतर्गत तब्बल दोनशे राख्या स्वतः तयार करून पाठवल्या होत्या.चांडोह ( ता.शिरूर ) गावचे सुपुत्र युनिट १०९ इन्फ्रट्री बटालियन मराठा लाईटचे मेजर संतोष धोंडिभाऊ पानमंद हे गावी आलेले असताना त्यांच्याकडे गावडे विद्यालयातील मुलींनी बनलेल्या राख्या दि.१४ ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या होत्या.त्या राख्यांचा स्वीकार करून ते जम्मू काश्मीर येथील देशाच्या सिमेवर तैनात बटालियन कडे त्याच दिवशी रवाना झाले होते.
गावडे विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या मुलींनी तयार केलेल्या राख्या पत्यक्ष सिमेवर देश रक्षण करणाऱ्या सैनिक भावांना (रामबण ,जम्मू काश्मिर ) येथे पोहोच होऊन तेथे रक्षाबंधन सण साजरा होत असताना सैनिक भावांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.आपण घरापासून कितीही दुर असलो तरी आपली काळजी घेणाऱ्या आपल्या बहिणी पाठीमागे असल्याचे सुतोवाच त्यांना झाले होते.याच सैनिक भावांनी आपल्या बहिनींप्रती कृतज्ञता व्यक्त करून शुभ संदेश पाठवत देश रक्षणाचे वचन दिले असल्याची माहिती गावडे विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास घोडे यांनी दिली.