सेकंडरी स्कूल्स् एम्प्लॉईज क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटी लि. मुंबई या पतसंस्थेची ४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.१८ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सभागृह परेल मुबंई या ठिकाणी उत्साहात संपन्न झाली. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करीत प्रास्ताविक भाषणामध्ये संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला व पुढे सांगितले की संस्थेने नुकताच २००० कोटींचा टप्पा पूर्ण करून २५०० कोटींचे उद्दिष्ट पुर्तीकडे वाटचाल सुरू केली आहे ३२००० सभासद संख्या असून २८ शाखा संस्था चालवित आहे.
आजच्या सभेत काही नवीन विषयांना मंजुरी सभासदांनी दिली.त्यामध्ये उपविधी दुरुस्ती,निधी नियमावली,सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या नियोजनाबाबत,शाखांना जागा खरेदी,शाखांची कार्यालये दुरुस्ती व नूतनीकरण,महाबळेश्वर येथील संस्थेच्या जागेवर प्रशिक्षण केंद्र इमारत उभारणी बाबत तसेच सभासद वैद्यकीय विमा योजना विस्तारीकरण नवीन योजना सहकार शिक्षण व प्रशिक्षण,संगणक प्रणाली मध्ये बदल,पर्यटन,शाखा विस्तार,विविध कल्याणकारी ठेवींच्या योजना,जीवन सुरक्षा ठेव योजना,सभासद पाल्य शैक्षणिक योजना,आदर्श शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार समारंभ,निवृत्त सभासद मानधन अशा अनेक विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करत दुरुस्ती सुचवून विषय सर्वांनूमते मंजूर केले.आणि सभासदांना १५℅ लाभांश त्यांच्या खात्यावर रक्षाबंधनापासून जमा होईल असे यावेळी अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
संस्थेचे सचिव किशोर पाटील यांनी सभेची नोटीस वाचून दाखवली,उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, सहसचिव सतिश माने,खजिनदार सतेश शिंदे,तज्ञ संचालक गुलाबराव गवळे,संचालक पांडुरंग कणसे,अजित चव्हाण,सचिन नलवडे,प्रमोद देशमुख, भाऊसाहेब आहेर,जगन्नाथ जाधव,प्राचार्य तुकाराम बेनके,गोविंदराव सुळ,पंकज सिंह,शकिल अन्सारी,वनिता भोसले,जयश्री गव्हाणे,वैशाली बेलोसे इ.संचालक मंडळांनी वेगवेगळ्या विषयावर ठराव मांडले व सभासदांनी त्यास मंजुरी दिली.