गोलेगाव ( प्रतिनिधी )
ता.17 प्राथमिक आरोग्य केंद्र करडे ता शिरुर अंतर्गत उपकेंद्र गोलेगाव याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र गोलेगाव येथे घरोघरी जाऊन कंटेनर सर्व्हेक्षण करुन पाण्याचे साठे तपासणी केली,दुषित कंटेनर आढळून आले ते पाण्याचे (भांडी) कंटेनर खाली करण्यात आले, ग्रामपंचाय मार्फत कोरडा दिवस पाळण्यात यावा या विषयी माहिती दिली, तसेच सर्वांनी आपल्या घरातील पाण्याचे साठे भांडी आठवड्यातुन एक दिवस खाली करावीत, व ती खाली केलेली भांडी घासुन पुसुन कोरडी करुन नंतर दुस-या दिवशी त्यामध्ये पाणी भरावे,तसेच पाण्याचे साठे बॅलर ,राजण, टाकी, इत्यादी जे पाण्याचे साठे आहेत ते झाकणाने झाकुन ठेवावे किंवा कपड्याने झाकावेत, जेणेकरुन त्यामध्ये डास अंडी घालणार नाहीत, इतरत्र पडलेले फुटलेले माठ , बादली, टायर ,भंगार सामान ,नाराळाच्या करवंट्या, प्लास्टिक ड्रम,कॅन यामध्ये पावसाचे पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी, निकामी वस्तु असल्यास झाकुन ठेवावेत. अथवा निकामी टायर इतर वस्तु जाळुन टाकावेत, घरा शेजारी अथवा जवळपास पाणी साठले असल्यास साठलेल्या पाण्याची डबकी वाहती करावी, आणि खाली न करता येणा-या ठिकाणी उदा पाण्याची टाकी,खोल डबके आशा ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात यावे. तसेच परिसर स्वच्छ असावा,वरीलप्रमाणे काळजी घेतल्यास डास उत्पत्ती होणार नाही, डास हे स्वच्छ पाण्यातच अंडी घालतात,साठलेले स्वच्छ पाणी रांजण ,मठ,बॅलर, ड्रम,कुलर,फ्रिज, व इतरत्र पडलेले टायर,नारळकरवंट्या भंगारवस्तु, यामध्ये पावसाचे पाणी साठल्यानंतर डास त्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालतात व नंतर त्याच अंड्यातून आठ ते बारा दिवसात डासांची पैदास होऊन तेच डास जर एखादया दुषीत व्यक्तीस चावला तर(डेंग्यु मलेरिया झिका चिकुनगुन्या झालेल्या व्यक्तीस) चावल्या नंतर तोच डास निरोगी व्यक्तीस चावल्या तर त्यालाही त्याच आजाराची लागण होते, जर डास पैदास झाले नाही तर झिका डेंग्यु चिकुनगुन्या मलेरीया असे डांसांमर्फत होणा-या कुठल्याही प्रकारचे साथीचे आजार होणार नाहीत, अशी आरोग्य अधिकारी यांनी दिली. डेंग्यु झिका चिकुनगुन्या मलेरीया विषयी घरोघरी माहिती देण्यात आली. कोणी आजारी पडल्यास सरकारी दवाखान्यात जाण्याचे अहवान करण्यात आले.
करडे येथील वैद्यकीय अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी (प्रभारी) डॉ कट्टीमणी व तालुका आरोग्य विस्तार अधिकारी संभाजी कोकडे यांचे मार्गदर्शनाखाली करडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य निरीक्षक संजय मिसाळ यांनी आरोग्य सेवक,आरोग्य सेविका व आशाताई यांच्या तीन टिम मार्फत माहिती देण्यात आली.