शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार

शिव – शाहु – फुले – आंबेडकरांच्या तसेच संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर व अन्य सुफी संतांच्या पुरोगामी महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अनेक संविधान विरोधी जातीयवादी व धर्मांध प्रवृत्ती व शक्तींना संत ज्ञानेश्र्वर महाराजांचे ‘ जे खळांची वैंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे ‘ हे पसायदानात सांगितलेले मानवतावादी विचार मान्य नाहीत का? असा प्रश्न समस्त मुस्लिम जमात, महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष हाजी इर्शादभाई यांनी उपस्थित केला असुन अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) पैगंबरांसंदर्भात वादग्रस्त विधान करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांची दहशतवादी विरोधी पथका ( ATS ) कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी हाजी इर्शादभाई यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यात येत्या काही महिन्यांत विधान सभेच्या निवडणुका होत असुन जातीयवादी व धर्मांध शक्तींकडून राज्यात अशांती व धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या हेतू पुर्वक प्रयत्न करीत आहेत. काही संविधान विरोधी कृत्य करणारे व मानवतेचे शत्रू तसेच काही सुपारी बहाद्दर लोकांचा उपयोग करून राज्यात हिंदू – मुस्लिम, मराठा – ओ. बी. सी. यांच्यात जाणीव पूर्वक जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संविधानिक पदावर काम करणाऱ्या मंत्र्यांपासून,आमदारांपासून ते ढोंगी धार्मिक धर्मगुरू पर्यंत सर्वच इस्लाम धर्माला बदनाम करून व प्रेषितांची व सुफी संतांची अर्वाच्य भाषेत विटंबना करून मुस्लिम समाजाला डिवचण्याचा व समाजा – समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुस्लिम समाज अशा संविधान विरोधी राष्ट्रद्रोही मानवता विरोधी जातीयवादी दहशतवादी धर्मांध प्रवृत्तींचा जाहीर निषेध करीत आहे. सरकारने व प्रशासनाने अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी हाजी इर्शादभाई यांनी केली आहे.

सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांची दहशतवादी विरोधी पथकाकडून ( ATS ) चौकशी करण्यात यावी व त्यांचेवर त्वरित गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी हाजी इर्शादभाई यांनी केली आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button