जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित पुष्पावती विद्यालय डिंगोरे येथे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ आणि जायन्ट्स् क्लब पुणेचे खजिनदार डॉक्टर चंद्रशेखर वल्हवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलचे प्रमुख संजय देशपांडे,प्रज्ञा देशपांडे,जीवन प्रबोधिनी ट्रस्ट पुणेचे अध्यक्ष डॉ.कैलास बवले पत्रकार धर्मेंद्र कोरे,प्रा.धनंजय लोखंडे यांच्या प्रमुखउपस्थितीत कौशल्यावर आधारित उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक प्रतीक अकोलकर यांनी दिली
आजच्या स्पर्धेच्या युगात पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य निर्माण करणे ही काळाची गरज असून कौशल्यावर आधारित शिक्षणाचे कधीही विस्मरण होत नसून त्यामुळेच विद्यार्थी पुढील जीवनात प्रगती करण्यास सक्षम होईल असे विचार डॉ कैलास बवले व प्राध्यापक संजय देशपांडे यांनी व्यक्त केले सुतार काम,बागकाम, प्लंबिंग,संगणक,इलेक्ट्रिक फिटींग,रांगोळी,दागिने तयार करणे मेहंदी काढणे,शेतीपूरक व्यवसाय इत्यादी अनेक कौशल्यांविषयी तज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले
याप्रसंगी डिंगोरे गावच्या सरपंच सीमा सोनवणे ज्येष्ठ नागरिक संघ डिंगोरेचे अध्यक्ष लक्ष्मण लोहोटे ग्रामविकास मंडळाचे सचिव प्रदीप गाढवे सहसचिव पंकज घोलप उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय घोलप यांनी केले तर उपस्थितांचे आभार जगन्नाथ गाढवे यांनी मानले.