जुन्नरचे आक्रमक बिबटे जामनगरच्या वनतारासाठी सज्ज.(अॅम्ब्युलन्सद्वारे आज होणार रवानगी.
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यातीलबिबट्यांच्या हल्ल्याची मालिका थांबताना दिसत नाही गेल्या काही दिवसांत जुन्नर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात पाळीव प्राण्यांसोबत मानवावर हल्ले सुरु असताना या बिबट्याचा उपद्रवाचा अत्यंत ज्वलंत प्रश्न बनलेल्या जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रातून जेरबंद केलेले १० उपद्रवी बिबट्यांची ज्या बिबट्यांनी मानवावर हल्ले केले व त्यात जीवितहानी केलेल्या बिबट्यांना जामनगरला (गुजरात) रवानगी करण्यासाठी जुन्नर वनविभाग प्रशासन सज्ज झाले आहे.जगातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगरमधील ‘वनतारा प्राणी संग्रहालयात माणिकडोह येथून १० बिबटे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी तीन महाकाय अॅम्ब्युलन्स ओतूर उदापुर मार्गे सायंकाळी सात वाजता माणिकडोह जुन्नरमध्ये पोहचल्या असून,आज बुधवार दिनांक ३१ जुलै बिबट्यांची रवानगी करण्यात येणार आहे.बिबट्यांना घेऊन जाण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी २० ते २५ जणांचेपथक अॅम्ब्युलन्स सोबत जुन्नरमध्ये दाखल झाले आहे. हायड्रॉलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय या महाकाय अॅम्ब्युलन्समध्ये आहे.
माणिकडोह जुन्नर ते जामनगर हा प्रवास शेकडो किमीचा अधिक जोखमीचे असल्याने अॅम्ब्युलन्समध्ये बिघाड झाल्यास अथवा इतर समस्या उद्भवल्यास ‘ब्रेकडाउनव्हॅन’ ही मदतीला देण्यात आली आहे.रवानगी करण्यात येणाऱ्या बिबट्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये दाखल केले जाईल.त्यानंतर ही वाहने जामनगरकडे रवाना होणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.