प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन करणाऱ्या शाळेतील आयोजकांची बैठक जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येरवडा,पुणे या ठिकाणी संपन्न झाली बैठकीच्या निमित्ताने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजकांना मार्गदर्शन करताना जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे म्हणाले की तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा निकोप वातावरणात होणे अपेक्षित असून कौशल्य असलेला खेळाडूच जिल्हास्तरावर निवडला जाणे गरजेचे आहे.
सर्व खेळाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून होतकरू, कौशल्य असलेल्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला तरच आपले विद्यार्थी जिल्हा, विभाग,राज्य,राष्ट्रीय पातळीवर चमकतील त्यामुळे स्पर्धा आयोजकांनी स्पर्धेदरम्यान परिपूर्ण ज्ञान असलेले पंच,वेळाधिकारी,गुणलेखक तसेच स्पर्धेसाठी आवश्यक असलेले स्वयंसेवक यांचे नियोजन करून खिलाडूवृत्तीने या स्पर्धा संपन्न कराव्यात.स्पर्धेदरम्यान जिल्हास्तरावून आमचे सर्व तालुका क्रीडा अधिकारी भेट देऊन स्पर्धेचं निरीक्षण करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
सर्व आयोजकांना शैक्षणिक वर्ष २०२४…२५ मध्ये होणाऱ्या पावसाळी क्रीडा स्पर्धांसाठी कसगावडे यांनी शुभेच्छा दिल्या.तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजकांच्या बैठकीसाठी तालुका क्रीडा अधिकारी दादा देवकाते,शिल्पा चाबूस्कवार,सोलनकर सर,क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी,विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष जितेंद्रकुमार थिटे,शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे,महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य निलेश जगताप,खेड तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष नितीन वरकड,माजी अध्यक्ष रामदास रेटवडे,दौंड तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष जालिंदर आवारी, बारामती तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष अशोक देवकर,ॲथलेटिक्स संघटनेचे कैलासराव खंडागळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक व तालुका क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते यांनी तर आभार पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत यांनी मानले.