जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतुर ता:-जुन्नर येथील फापाळेशिवारात गेनभाऊ कोंडीबा फापाळे व तानाजी फापाळे यांचे मालकी गट नंबर 24 /७ मधील श्री कळमजाई मंदिर माता मंदिराचे शेजारील भागात असलेल्या बिगर कठड्याच्या विहिरीमध्ये बिबट्याचा बछडा पडल्याची माहिती सोमवार दिनांक-२९ जुलै रोजी दुपारी तीन वाजता मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी ओतूर वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल ओतूर सुधाकर गीते वनपाल कु रुपाली जगताप वनरक्षक विश्वनाथ बेले परसरा खोकले वनसेवक किसन केदार ,गंगाराम जाधव,गणपत केदार कर्मचारी व रेस्कु टीम आळे यांच्यासह ताबडतोब जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहाणी केली.
सदरील विहीर अंदाजे ८०फुट खोल असुन त्यात बिबट्याचा बछडा पडला होता सदर बिबट बछडा खोल विहिरीतुन काढण्यासाठी वनकर्मचारी यांनी अतोनात प्रयत्न केले त्याकामी अनुराग फापाळे तेजस फापाळे,प्रदीप फापाळे,राजू भानगडे,भूपेश फापाळेसंजय फापाळे,हेमंत जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले पण विहीर खोल असल्याने बिबट बछडास वाचविण्यास वनविभागास अपयश आले सदर बिबट्याचा बछडा खोल विहिरीत बुडाला असल्याने तो खोल पाण्यात विहिरीतील मोटारीस अडकल्यामुळे मृत बछड्यास बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत .
ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी व उपस्थित कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सदर मृत बिबट बछडा विहीरीतुन बाहेर काढून पंचनामा करण्यात आला हा मृत बछडा साधारणतः आठ वर्षाचा असून मृतदेह शवविच्छेदन करून उदापूर रोपवाटिकेत दहण करण्यात आले.